पासलकर वसाहत दौंड येथे विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी.
प्रतिनिधी – विकी ओहोळ
मो. न.- 8446119158
दौंड – संपूर्ण विश्वात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत आहे यात दौंड शहरातील लिंगाळी ग्रामपंचायत येथील पासलकर वसाहत येथे दरवर्षी प्रमाणे यावर्षी ही डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती थाटात उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी जमलेल्या उपासक उपसिका यांना आईस्क्रीम वाटप करण्यात आली
कार्यक्रमासाठी पासलकर वसाहत येथील लिंगाळी गावच्या पोलीस पाटील नीता वाघमारे, दिपक वाघमारे,सामाजिक कार्यकर्ते जीवन भंडारी,हरेश बनसोडे, शीतल भंडारी,रविकांत चौधरी,राजेश गजभिये, लोंढे मॅडम, संगिता विकी ओहोळ, शिंदे मॅडम,सूरज सावंत व परिसरातील ग्रामस्थ आणि सर्व लहान थोर ज्येष्ठ भीम अनुयायी उपस्थित होते.
बौध्दाचार्य साहेबराव पोळ यांनी धार्मिक विधी घेतला व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले व सर्वांचे आभार मानले आणि मनोगत व्यक्त केले जयंती दरवर्षी उत्साहात साजरी करा कोणत्याही परिस्थितीत त्यामध्ये खंड पडू दिला नाही पाहिजे. सर्वांचा उत्साह आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या घोषणा यांनी परिसरात जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.