नीरा नरसिंहपूर परिसरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे 132 वी जयंती अनेक ठिकाणी साजरी करण्यात आली.
निरा नरसिंहपुर: दिनांक- 14 ;प्रतिनिधी- डॉक्टर सिद्धार्थ सरवदे.
इंदापूर तालुक्यामधील निरा नरसिंहपुर येथे आज दिनांक 14 एप्रिल म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती चा दिवस असतो. नीरा नरसिंहपूर गावांमध्ये पंचशील तरुण मंडळाचे अध्यक्ष अशोक हनुमंत सरवदे व उपाध्यक्ष घनश्याम सरवदे यांच्या पुढाकाराने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये निरा नरसिंहपुर गावच्या सरपंच अश्विनी चंद्रकांत सरवदे व सरपंच प्रतिनिधी चंद्रकांत सरवदे ,विजय सरवदे, आनंद काकडे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी माजी सरपंच अण्णासाहेब काळे, धनंजय पवार,संतोष मोरे, गोरख लोखंडे,धनंजय दुनाके, ऋषिकेश दळवी आदी मान्यवरांचे भाषणे झाली.
चैतन्य विद्यालय व सुधाकर गोविंद महाविद्यालय येथे सर्व शिक्षक स्टाफ आणि ग्रामस्थ यांच्या वतीने प्रतिमेचे पूजन करण्यात आले तसेच शिवपार्वती इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनियर कॉलेज यांचे संस्थापक अध्यक्ष प्राचार्य रविराज काकडे यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष नारायण खंडाळे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन केले या कार्यक्रमाच्या प्रसंगी सरपंच प्रतिनिधी विजय सरवदे, डॉक्टर सिद्धार्थ सरवदे, रविराज काकडे यांचे भाषणे झाली.या कार्यक्रमासाठी गौतम सरवदे,अतुल हावळे, सौ.माया शिंदे आणि सर्व शिक्षक स्टाफ तसेच ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती निरा नरसिंहपूर ग्रामपंचायत मध्ये सौ. रेणुका काकडे आणि सौ. अर्चना सरवदे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून व बुद्ध वंदना घेऊन करण्यात आली.यावेळी सरपंच प्रतिनिधी चंद्रकांत सरवदे, माजी सरपंच जगदीश सुतार,दशरथ राऊत, संतोष मोरे,विठ्ठल देशमुख, सुदर्शन सुरवसे, सोनू केसकर, डॉक्टर सिद्धार्थ सरवदे, आनंद काकडे, ग्रामसेवक गणेश लंबाते आदी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पार पडली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्ताने निरा नरसिंहपुर गावातील ग्रामस्थ हे अतिशय आनंदी आणि उत्साही असल्याचे जाणवले अशा पद्धतीने अतिशय छान वातावरणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचा कार्यक्रम निरा नरसिंहपुर गावांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पार पडला.