June 30, 2025 2:19 pm

डोंबिवलीत बिबट्याची कातडी विकण्याच्या उद्देशाने आलेल्या धुळे येथील दोन जणांना अटक..

अपनी भाषा में पढ़े! Translate

डोंबिवली – बिबट्याचा शिकार करुन त्याची कातडी डोंबिवलीत विकण्यासाठी आलेल्या धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील दोन जणांना रामनगर पोलिसांनी सोमवारी रात्री अटक केली. त्यांनी ही कातडी डोंबिवलीतील ठाकुर्ली भागात कोणाला विकण्यासाठी आणली होती याचा तपास पोलीस करत आहेत.

जयंतीलाल साळी, दिनेश जागरे अशी अटक इसमांची नावे आहेत. ते धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील रहिवासी आहेत. ठाकुर्लीतील ९० फुटी रस्त्यावर दोन इसम बिबट्याची कातडी विकण्यासाठी येणार आहेत, अशी गुप्त माहिती रामनगर पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी या भागात सोमवारी रात्री सापळा रचला होता.

रात्री १० दहा वाजता दोन इसम हातात दोन पिशव्या घेऊन ९० फुटी रस्त्यावर फिरू लागले. साध्या वेशातील पोलिसांना त्यांचा संशय आला. एका पोलिसाने त्यांना येथे कशासाठी आला आहात, विचारणा करताच ते उडवाउडवीची उत्तरे देऊन तेथून पळण्याचा प्रयत्न करू लागले. तात्काळ पोलिसांनी या दोघांना घेरले. त्यांची चौकशी करताच त्यांच्या पिशव्यांमध्ये बिबट्याची कातडी आढळून आली. रामनगर पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!