June 29, 2025 11:05 pm

दिपक उखर्डु वाल्हे … धोबी परिट समाजातील मानाचा समजला जाणारा “राष्ट्रीय समाजभुषण” पुरस्काराने सन्मानित

अपनी भाषा में पढ़े! Translate

दिपक उखर्डु वाल्हे … धोबी परिट समाजातील मानाचा समजला जाणारा “राष्ट्रीय समाजभुषण” पुरस्काराने सन्मानित

अमळनेर : येथील सामाजिक कार्यकर्ते तथा डेबुजी झिंगराजी जाणोरकर ग्रंथालयाचे संंस्थापक अध्यक्ष लाँन्डी व्यावसायिक दिपक उखर्डु वाल्हे हे गेल्या 19 – 20 वर्षांपासून करित असलेल्या सामाजिक कार्य व त्यांनी राबविलेले विविध क्षेत्रातील उपक्रम व कोरोना काळातील उपक्रमांची दखल घेऊन अखिल भारतीय धोबी महासंघाच्या (ABDM) वतीने दिला जाणारा यंदाचा धोबी समाजातील मानाचा समजला जाणारा राष्ट्रीय समाजभुषण पुरस्कार 2023 या पुरस्कार अखिल भारतीय धोबी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कृष्णकुमार कनोजिया यांच्या शुभहस्ते भाईंदर मुंबई येथे प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून वरिष्ठ मार्गदर्शक, उद्योगपती राजेंद्रशेठ आहेर, वरिष्ठ राष्ट्रीय उपाध्यक्ष एकनाथराव बोरसे, धोबी समाज आरक्षण प्रमुख अशिष कदम, परिट (धोबी) सेवा मंडळ प्रदेश उपाध्यक्ष अरुण धोबी, प्रा. डॉ. रंजनी लुगसे, धुळे मनपा नगर सेवक सोनल शिंदे, प्रा. डॉ सदाशिव ठाकरे, सुरेश ठाकरे, राजेंद्र सोनवणे, भास्कर महाले आदी उपस्थित होते, आता पर्यंत दिपक वाल्हे यांना राष्ट्रीय राज्यस्तरीय विभागीय जिल्हास्तरीय पुरस्कार तसेच कोरोना काळात केलेल्या विविध उपक्रमाबद्दल कोरोना योद्धा पुरस्कार असे आतापर्यंत 46 पुरस्कार प्राप्त झाले आहे. दिपक वाल्हेनी पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की, आजपर्यंत आपण सर्वांनी केलेल्या सहकार्यानेच शक्य झाले. अखिल भारतीय धोबी महासंघ (ABDM) व आपल्या सर्वाचाच आभारी आहे. पुरस्कार मिळाल्याने जबाबदारी वाढते अधिक काम करण्याची प्रेरणा मिळते अर्थात काम करताना अनेक अडचणी येतात पण पुन्हा अशा राष्ट्रीय स्तरावरील पुरस्काराने नव्याने काम करण्याच्या उत्साह निर्माण होतो. पुरस्काराने मला प्रेरणा मिळेल व भविष्यात देखील नवनवीन उपक्रम करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!