June 29, 2025 10:52 am

संत गाडगे महाराज यांना जयंतीनिमित्त नवी दिल्ली येथे महाराष्ट्र परिचय केंद्रात अभिवादन

अपनी भाषा में पढ़े! Translate

संत गाडगे महाराज यांना जयंतीनिमित्त नवी दिल्ली येथे महाराष्ट्र परिचय केंद्रात अभिवादन

नवी दिल्ली, दि. 23 : थोर समाजसुधारक संत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त राजधानी नवी दिल्ली येथील महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्रात आज अभिवादनाचा कार्यक्रम झाला.

कॉपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात प्रभारी निवासी आयुक्त डॉ. निधी पांडे यांनी संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार यांच्यासह महाराष्ट्र सदनाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संत गाडगे महाराजांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

महाराष्ट्र परिचय केंद्रात अभिवादन
महाराष्ट्र परिचय केंद्रात आयोजित कार्यक्रमात संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. परिचय केंद्राच्या प्रभारी उपसंचालक (माहिती) अमरज्योत कौर – अरोरा यांनी संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपस्थित कर्मचाऱ्यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!