June 29, 2025 3:35 pm

श्रीमती डी.आर.हायस्कूलचे माजी विद्यार्थी माननीय डॉ. गजानन डांगे यांची जागतिक G-20 अंतर्गत C-20 वर निवड झाल्याबद्दल सत्कार

अपनी भाषा में पढ़े! Translate

श्रीमती डी.आर.हायस्कूलचे माजी विद्यार्थी माननीय डॉ. गजानन डांगे यांची जागतिक G-20 अंतर्गत C-20 वर निवड झाल्याबद्दल सत्कार
प्रतिनिधी आप्पासाहेब कोळी
नंदुरबार:येथील श्रीमती डी.आर. हायस्कूल मध्ये एस.एस. सी.1985 च्या बॅच मधील माजी विद्यार्थी डॉ.गजानन डांगे यांचा नं.ए.सोसायटी संस्थे तर्फे सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजनाने करण्यात आले.
व्यासपीठावर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे माजी चेअरमन व विद्यमान कार्यकारिणी सदस्य गिरीश खुंटे तर प्रमुख अतिथी म्हणून ज्यांची नुकतीच निवड जागतिक स्तरावरील G-20 संघटनेच्या अंतर्गत C-20 मधील लाईफ फॉर एन्व्हायरमेंट ग्रुपच्या राष्ट्रीय संयोजक पदी करण्यात आलेले शाळेचे माजी विद्यार्थी डॉ.गजानन डांगे उपस्थित होते तसेच कार्यकारिणी सदस्य व डी.आर.हायस्कूलचे पर्यवेक्षक पंकज पाठक ,कार्यकारणी सदस्य व डॉक्टर काणे गर्ल्स हायस्कूलचे पर्यवेक्षक श्रीराम मोडक, शाळेचे मुख्याध्यापक नारायण भदाणे डी.आर.ज्यु.कॉलेजचे उपप्राचार्य मोहन अहिरराव, जनरल बॉडी सदस्य व डी.आर.हायस्कूलचे पर्यवेक्षक विपुल दिवाण,डॉ.काणे गर्ल्स हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सीमा मोडक, डॉ.काणे विद्या मंदिराच्या मुख्याध्यापिका सुलभा महिरे ,न्यू. इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका राजश्री शिवदे आदी मान्यवर ही उपस्थित होते.
प्रमुख अतिथी डॉ.गजानन डांगे यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त करताना सांगितले की या पदाची नेमणूक जास्त शिकण्यासाठी केली जाते,तसेच G-20 संघटनेच्या लोगो चा अर्थ स्पष्ट करताना जगातील एकूण 20 संपन्न,ताकदवान राष्ट्रांच्या समावेश करून सर्वांना समान महत्त्व असूनआर्थिक धोरण, व्यापार,कर लावणे, कमी करणे आदि गोष्टीवर या संघटनेअंतर्गत त्या-त्या देशांचे फायनान्स मिनिस्टर चर्चा करतात तसेच G 20 च्या अंतर्गत C 20 या संघटनेतर्फे सामाजिक प्रश्नांची चर्चा,पर्यावरण,पाणी, दहशतवाद,नैसर्गिक आपत्तींच्या समस्यांचे निराकरण करून उपाय शोधणे तसेच अख्या जगाला वासुदैव कुटुंबकम या उक्ती प्रमाणे विकास करण्याचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून भारतीय जीवन शैलीचे अनुकरण संपूर्ण जगभर कसे केले जातील अशी अभ्यासपूर्ण माहिती आपल्या वक्तव्यातून सांगितली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात गिरीश खुंटे शिक्षणाचे महत्त्व व आपल्या शाळेतील माजी विद्यार्थ्यांचे वैभव हेच शाळेचे खरे वैभव आहेत म्हणून विद्यार्थ्यांनी सतत प्रयत्नशील रहा भरपूर अभ्यास करा व आपल्या आयुष्याच्या वाटेत मिळालेल्या संधीचे सोने करा असे स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन राहुल पाटील तर प्रास्ताविक पंकज पाठक व ऋणनिर्देश दिनेश वाडेकर यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेतील सर्व शिक्षक बंधू-भगिनीचे मार्गदर्शन तर शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!