श्री काशीविश्वेश्वर क्षेत्र सुरंगली येथे भागवत ग्रंथ पारायण अखंड हरी नाम सप्ताहाचे आयोजन “पन्नास वर्षांपासुन अखंड हरिनाम सप्ताहाची परंपरा कायम”.
भोकरदन तालुका प्रतिनिधी डॉ.संजीव पाटील. भोकरदन:-तालुक्यातील सुरंगली येथील काशी विश्वेश्वर तिर्थक्षेत्र येथे प्रतीवर्षाप्रमाणे याही वर्षी भागवत ग्रंथ पारायण व अखंड हरीनाम सप्ताहाचे आयोजन करण्यातआले आहे, वे.शा.सं.ह.भ.प.भागवताचार्य दत्तात्रय महाराज गोंदीकर यांच्या रसाळ वाणीतुन भागवत पठण आणि हरी नाम सप्ताहास दिनांक 12 फेब्रुवारी रविवार पासुन सुरवात झाली असुन अनेक भक्त मंडळी याचा लाभ घेत आहे.अन्नदातामंडळी कडुन भाविक भक्तांना रोज अन्नदान करण्यात येत आहे.काशीविश्वेश्वर मंदीरात महारुदाचे आयोजन करण्यात आले आहे, या सप्ताहात अखंड विना वादन,भजन,वाघ्या मुरळी,शिवलिलामृत ग्रंथ पारायण,आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत,महाशिवरात्री निम्मित दिनांक 20 फेब्रुवारी सोमवार रोजी सूरंगली येथे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे,तरी याचा सर्व भाविक भक्तांनी लाभ घ्यावा अशी विनंती गावकऱ्याकडून करण्यात येत आहे.
काशी विश्वेश्वर श्री ची पालखीी सोहळ्याचे आयोजन महाशिवरात्री ला करण्यात येते टाळमृदगं गजरात श्री काशी विश्वेश्वर ची मिरवणूक पालखी सोहळा आयोजीत करण्यात येतो. महाशिवरात्री लघुरुद्र अभिषेक करण्यात येतो.