June 30, 2025 10:21 am

सामाजिक बांधिलकी जपून क्षीरसागर कुटुंबियांनी केली निवासी मूकबधिर विद्यालयास मदत

अपनी भाषा में पढ़े! Translate

सामाजिक बांधिलकी जपून क्षीरसागर कुटुंबियांनी केली निवासी मूकबधिर विद्यालयास मदत
.
बारामती (सह- संपादक – संदिप आढाव)
.
कऱ्हावागज, ता. बारामती येथील निवासी मूकबधिर विद्यालयासाठी तसेच या विद्यालयामध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलांच्या मदतीसाठी माळेगाव बुद्रुक येथील एस पी सराफ प्रा. लि. या दुकान चे सर्वेसर्वा चेअरमन शिवाजी क्षीरसागर यांनी त्यांचा स्वतःचा तसेच त्यांचे मुलाच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त धावून आले. सामाजिक बांधिलकीची जाणीव असलेल्या शिवाजी क्षीरसागर यांनी लग्नाचा वाढदिवस या मूकबधिर मुलांसोबत साजरा केला. मुलांना मिठाई भेट देऊन अल्पोपहार व केक वाटप करण्यात आले. तसेच या निवासी मूकबधिर विद्यालयाकरिता रोड ला लावणेकरिता क्षीरसागर यांच्या वतीने नामफलक बनवून आणला होता तो भेट म्हणून देण्यात आला. एस पी सराफ कंपनी नेहमीच या मूकबधिर विद्यालयाच्या अडीअडचणी वेळी धावून जात असतो. हे सारे पाहून या विद्यालयामध्ये शिक्षण घेत असलेल्या मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसांडून वाहत होता.
यावेळी एस पी सराफ प्रा. लि. चे चेअरमन शिवाजी क्षीरसागर, संचालिका माधुरी क्षीरसागर, संचालक अॅड. शाम क्षीरसागर, संचालिका ज्ञानेश्वरी क्षीरसागर, महादेव झेंडे, निवासी मूकबधिर विद्यालयाच्या सर्वेसर्वा रामेश्वरी जाधव, शिक्षिका अश्विनी भोसले, अपर्णा वेदपाठक इत्यादी उपस्थित होते…

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!