June 29, 2025 9:12 pm

पालकमंत्र्यांनी घेतली सिटीपीएसच्या त्या कन्व्हर बेल्टची दखल…. काढले चौकशी चे पत्र…

अपनी भाषा में पढ़े! Translate

पालकमंत्र्यांनी घेतली सिटीपीएसच्या त्या कन्व्हर बेल्टची दखल…. काढले चौकशी चे पत्र…

प्रतिनिधी-विजय केळझरकर
उर्जा निर्मिती साठी कोळसा पुरवठा आसपास खाणीतून केल्या जातो. ते कोळसा पाॅवर स्टेशन पर्यंत पोहचविण्यासाठी कन्व्हटर बेल्टचा वापर केला जातो.त्या बेल्ट साठी करोडो रुपये खर्च केले जातात.याच बेल्टसाठी थायसन व भावना या कंपनीला करोडो रुपयांचे कंत्राट देण्यात आले आहे.आता नुकताच कोळसा वाहून नेण्याचे कामे चालू असतांनाच कन्व्हटर बेल्ट तुटल्याने करोडो रुपयांचे नुकसान शासनाचे झाले आहे.या कंपनीने करोडो रुपयांच्या कन्व्हटर बेल्टवर थातूरमातूर कामे करण्यात आली आहे.त्यामुळे कंत्राटाची मुदत संपण्यापूर्वीच बेल्ट तुटल्याने कोळसा वाहून नेण्याचे काम बंद पडले आहे.त्यामुळे विज निर्मिती खंडीत पडली आहे.यावेळी महाजनकोचे अधिकारी कर्मचारी व कंपणीचे कर्मचारी कार्यरत असतात त्यांचे याकडे अक्षम्य दुर्लक्ष झाल्यानेच हा अनर्थ घडला आहे.
तरी महोदय आपणास नम्र विनंती आहे, की थायसन व भावना कंपणीनी लावलेल्या करोडो रुपयांच्या कन्व्हटर बेल्टची सखोल चौकशी करावी, कन्व्हटर बेल्टची तपासणी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर चौकशी करून कारवाई करावी,थायसन व भावना कंपणीला काळ्या यादीत टाकण्यात यावा, वरीष्ठ स्तरावरून चौकशी करावी व दोषीवर १० दिवसांत कार्यवाही करावी अन्यथा शिवसेनेच्या पद्धतीने तिव्र आंदोलन करण्यात येईल होणाऱ्या परीणामास सर्वस्वी आपला विभाग जबाबदार राहील . असे निवेदन दिल्या नंतर पालकमंत्र्यांनी घेतली सिटीपीएसच्या त्या कन्व्हर बेल्टची दखल…. काढले चौकशी चे पत्र…

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!