June 29, 2025 3:39 pm

शशिकांत वारिशे यांच्या हत्येच्या निषेधार्थ गेवराई मध्ये निर्भीड पत्रकार संघाच्या वतीने तहसील व पोलीस प्रशासनास दिले निवेदन

अपनी भाषा में पढ़े! Translate

शशिकांत वारिशे यांच्या हत्येच्या निषेधार्थ गेवराई मध्ये निर्भीड पत्रकार संघाच्या वतीने तहसील व पोलीस प्रशासनास दिले निवेदन

गेवराई प्रतिनिधी- रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारिशे यांची झालेली निर्घृण हत्येच्या व राज्यभर पत्रकारांवरील वाढत असलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ गेवराई तालुका निर्भीड पत्रकार संघाच्या वतीने संस्थापक अध्यक्षा रुचिता मलबारी यांच्या आदेशानुसार जिल्हा अध्यक्ष देवेंद्र सिंह ढाका मार्गदर्शनाखाली गेवराई तहसील कार्यालय व पोलीस स्टेशन येथे निवेदन देण्यात आले.
पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या हल्लेखोरास पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत कठोरातील कठोर शिक्षा व्हावी अशी
मागणी गेवराई तहसिल कार्यालय व पोलीस स्टेशन गेवराई यांना या निवेदनाव्दारे केली आहे. यावेळी निर्भीड पत्रकार संघांचे जिल्हा उपाध्यक्ष शेख उस्मान,तालुका अध्यक्ष अमोल कापसे,तालुका उपाध्यक्ष शेख सलमान ,तालुका सचिव बाळासाहेब घाडगे, ता. कार्याध्यक्ष शिवनाथ काळे,ता. संघटक भाऊसाहेब महानोर,ता. सह संघटक
अशोक मोरे,ता. प्रसिद्धी प्रमुख
मनोज शेंबडे,शहराध्यक्ष सतीश वाघमारे,शहर उपाध्यक्ष शेख सलीम,शहर सचिव अंगद गावडे, कार्यकारणी सदस्य किरण शिंदे,सय्यद गफ्फार,
असलम कादरी,हारून शेख,औदुंबर खेडकर,
समीर शेख,अरुण खरे,आकाश खेडकर,विष्णू कुलाळ,संकेत खेडकर, आदी उपस्थित होते.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!