भारतीय जैन संघटनेचे पुणे विभागीय अध्यक्ष पदी सचिन भोगावत यांची निवड
(निलेश गायकवाड )
भारतीय जैन संघटनेचे पुणे विभागीय अध्यक्ष पद श्री सचिन बोगावत , उपाध्यक्ष पद हर्षल बटेवरा यांची निवड झाली आहे.पुणे येथे भारतीय जैन संघटनाची सर्वसाधारण सभा व मेळावा महावीर प्रतिष्ठान पुणे येथे पार पडला त्यावेळी महाराष्ट्र राज्य जैन संघटनेचे अध्यक्ष श्री नंदकुमार सांखला,संस्थापक अध्यक्ष विजयकांत कोठारी ,महाराष्ट राज्य सचिव दीपक चोपडा उपस्थित होते .
या मेळावा साठी राज्य कार्यकारिणीची व जैन संघटनाच्या माध्यमातून चाललेल्या कामकाजाची माहिती देण्यात आली या मेळाव्यासाठी पुणे जिल्ह्यातून दौंड, इंदापूर ,बारामती, शिरूर, सासवड, पुणे शहर ,पिंपरी चिंचवड या भागातून मोठ्या संख्येने जैन बांधव उपस्थित होते तर केडगाव ग्रामीण मधून श्री मनोज पोखरणा, निशांत चोपडा, संतोष शिलोत,अशोक कोठारी , देवेंद्र चोरडिया, नितीन छाजेड,सुहास संचेती आदी उपस्थिती होते.