गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त विविध कार्यक्रम
संत श्री गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त एकलहारे कॉलनी येथील वसाहतीतील हनुमान मंदीरात गजानन महाराज प्रकट दिन आयोजन समितीच्या वतीने विविध कार्यक्रम झाले.
सकाळी अभिषेक सोहळा झाला. ह.भ. प.सागर महाराज दिंडे यांचे कीर्तन झाले.
देवळाली मतदार संघाच्या आमदार सरोजताई आहेर यांनी कार्यक्रम ला भेट देऊन शुभेच्छा दिल्या
दुपारी मुख्य अभियंता नितीन पुणेकर, उपमुख्य अभियंता शशांक चव्हाण ,माजी नगरसेवक विशाल संगमनेरे, अरविंद वाकेकर, निवृत्ती कोंडावले, शरद मोरे,
सरपंच अरुण दुषिंग, सचिन जगताप, यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली.कार्यक्रम प्रसंगी मा नगरसेवक अशोक सातभाई, माध्यमिक विध्यमंदिर चे प्राचार्य कुटे सर,उप प्राचार्य गीते मॅडम व सर्व शिक्षक व कर्मचारी व सूर्यकांत पवार यांनी भेट दिली, नंतर महाप्रसादाचा कार्यक्रम झाला.
वैशालीताई नंदनवार यांनी गजानन महाराज यांची काढलेली मनमोहक 20 फुटाची रांगोळी भाविकांचे लक्ष वेधून घेत होती.
या यशस्वितेसाठी मनोज म्हस्के, सारंग येवले, राहुल जाधव, सतीश सोनवणे, विनोद फणसे, अनिल बागुल, दिलीप बर्वे ,सुनील टेमकर सचिन बोराडे,अजिंक्य थोरात,अभिषेक सोनवणे, प्रविण किंग्रे,जयंत चिखले, ओमकार पडवळ,नाना मोरे,उमेश पाटील, साहिल जोगदंड, संजय जाधव, नरेश महाजन,पुरुषोत्तम सोनवणे आदित्य पिंपळकर पियुष गुलदगड योगेश ददगाळ आदींनी परिश्रम घेतले.