आळसुंदे ता.कर्जत येथे सुमारे 4 कोटी 51 लाख रुपयांच्या विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा प्रा. राम शिंदे व खासदार सुजय दादा विखे पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न.
प्रतिनिधी.संदिप कायगुडे
कर्जत: आळसुंदे येथे सुमारे 4 कोटी 51 लाख रुपयांच्या विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा प्रा. राम शिंदे व खासदार सुजय दादा विखे पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.यावेळी बोलताना खासदार डॉ सुजय दादा विखे पाटील म्हणाले आपल्या देशाचे लाडके प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून देशभरामध्ये प्रत्येक गरिबाला प्रत्येक गावाला स्वच्छ पिण्याचे पाणी मिळेल या दृष्टिकोनातून सुरुवात करण्यात आलेली जल जिवन मिशन योजना आहे.आणि त्या चर्चे अंतर्गत फक्त नगर जिल्ह्यामध्ये जवळपास दोन ते अडीच हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आणि त्या दोन अडीच हजार कोटी पैकी आपल्या या अळसुंदे गावांमध्ये साधारण दोन कोटी रुपयांचे जलजीवन मिशनचे काम मंजूर करण्यात आले. आणि त्यांचे शुभारंभ आज मा. रामजी शिंदे साहेबांच्या हस्ते आपण या ठिकाणी करत आहोत ही संकल्पना ही प्रत्येक माणसाला स्वच्छ पिण्याचे पाणी मिळाले पाहिजे असी आहे.अनेक जुन्या योजना जिल्ह्यामध्ये कर्जत तालुक्यामध्ये आता संपुष्टात आल्या आहेत, काही ठिकाणी पाण्याचा उगम राहिलेला नाही अशा असंख्य अडचणी या कर्जत तालुक्यामधल्या विविध गावांमध्ये होत्या. आमदार रोहित पवार यांचे नाव न घेता खासदार साहेब म्हणाले योजना जाहीर झाल्यानंतर प्रत्येक जण म्हणायला लागला की मी निधी आणला, की हे माझे पैसे आहेत आणि म्हणून आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी संपूर्ण नगर जिल्ह्याला सांगू इच्छितो यांच्याशी कोणाचाही संबंध नाही, हे दोन कोटी रुपयांचे श्रेय जर कोणाला जात असेल तर ते फक्त आणि फक्त माननीय नरेंद्र मोदींनाच जाते आहे, ज्या पाणीपुरवठा योजनेचा आराखडा ही तुम्ही तयार केला नाही. त्याचे श्रेय घेताय, खरं तर भारतीय जनता पार्टीच्या सरकारच्या राज्यांमध्ये जल जीवन मिशनचे काम संपुष्टात आले आहे, आपल्याही राज्यात आज लोकांना स्वच्छ प्यायला पाणी मिळाले असते पण या महाराष्ट्रामध्ये तीन वर्षांमध्ये असलेले महाविकास आघाडी सरकारने फक्त आणि फक्त आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींजींना श्रेय मिळू नये म्हणून तीन वर्षे योजना रखडली गेली आणि आज जेव्हा माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकार आलं तेव्हा या सगळ्या योजना या तालुक्यामध्ये फिरत असताना दिसतायेत, मला आभार मानायचेत त्या गावाचे सर्व ग्रामस्थांचे विश्वासाने आपण सगळ्यांनी भारतीय जनता पार्टीच्या त्या ठिकाणी माननीय शिंदे साहेबांचं नेतृत्व स्वीकारत या गावांमध्ये सत्तांतर करून या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या सत्तेला कौल दिला आपल्या सरपंच केला आणि याचा परिणाम तुम्हाला दिसायला लागलाय, मागच्या आठवड्यामध्ये प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचा रस्ता आळसुंदे ते कर्जत नऊ किलोमीटर रस्ता त्या ठिकाणी घेतला गेला आणि तो पुढच्या एक वर्षांमध्ये पूर्ण केल्या जाईल . कुकडीचे आपल्या हक्काचं पाणी आपल्याला मिळू शकले नाही राज्यामध्ये सत्तांतर झाल्यानंतर आम्ही सर्वात प्रथम माननीय शिंदे साहेब असतील मी असेल आम्ही माननीय पालकमंत्र्यांचे अध्यक्षतेखाली मुंबईला बैठक घेतली तुम्हाला विश्वास बसणार नाही मागच्या तीन वर्षांमध्ये कर्जत तालुका पारनेर तालुका श्रीगोंदा तालुका नगर जिल्ह्याला त्यांच्या हक्काचं 22 टीएमसी पाणी मिळालेले नाही आपल्या शेतकऱ्यांच आपल्या जिल्ह्याच्या शेतकऱ्यांचं हे पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या लोकप्रतिनिधी पळून नेलं असे म्हणत आमदार रोहित पवार यांच्या वर निशाणा साधला, यानंतर बोलताना प्रा राम शिंदे साहेब म्हणाले मला आज प्रश्न पडला की अळसुंदे निंबे,राशिन,रस्ता त्यावेळेस मी मंजूर केला होता, आजही तुमची अपेक्षा हीच आहे की रस्ता तर मंजूर झालाय, लक्ष तुम्हीच द्या, आता तुम्ही काय करणार एवढा मला सांगा, रस्ता आहे मंजूर आम्हीच करायचा मुकादम आम्हीच राहायचं आज तुम्हाला ज्यांनी अपेक्षा दाखविल्या मी सगळ्यांना नाही म्हणत पण काही लोकांना म्हणतो असे म्हणत अडीच तीन वर्षांमध्ये काय आलं आपल्या गावाला असा प्रश्न केला, काहीच आलं नाही , ज्यां ठेकेदारांनी रस्ता निकृष्ट केला मात्र आमदार ते बगलबच्चे घेऊन फिरायला लागले आणि त्यावेळी सांगितलं होतं , रस्ता निकृष्ट झाला असेल तर त्या ठेकेदारावर त्या अधिकाऱ्यावर कारवाई का झाली नाही ❓ त्यांच्या फौजदारी गुन्हा करायला पाहिजे होता त्यांना ब्लॅक लिस्ट करायला पाहिजे होत त्यांच्या कडून वसुली करायची होती. या वेळी बोलताना ते म्हणाले कर्जत अळसुंदे रस्त्यासाठी सहा कोटी रुपये दिले आहेत पुढच्या एक वर्षात रस्ता कर्जत पर्यंत पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही, त्यांच्यासाठी मी सांगतो लोकसभेला जर रस्ता नाही झाला तर मत देऊ नका असे म्हणत रस्ता तो पूर्ण करणारच अशी एक प्रकारे ग्वाही दिली. ग्रामपंचायत सदस्य सरपंच यांना या पुढे देखील निधी कमी पडू देणार नाही असे सांगितले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रमोद देवकाते यांनी केले, तर प्रस्ताविक गणेश पालवे यांनी आपल्या खास शैलीत केले. सुनील गावडे, अंबादास पिसाळ, आशोक खेडकर, सचिन पोटरे, बापूसाहेब नेटके, पप्पू शेठ धोदाड, गणेश पालवे, सोयब काझी, तात्यासाहेब माने, दादासाहेब सोनमाळी, काका धांडे, धनंजय मोरे, विक्रम राजे भोसले, विनोद दळवी, युवराज शेळके, सुनील यादव, गणेश क्षीरसागर , प्रशांतजी बुद्धिवंत, तहसीलदार नाईकवाडे साहेब, अमोल जाधव साहेब, वाकचौरे साहेब , माने साहेब, उपस्थित असलेले सरपंच सौ स्मिता जिजाबापू अनारसे ,उपसरपंच जीवन साळुंखे, त्याचबरोबर सर्व ग्रामपंचायत सदस्य व गावातील नागरिक भास्करतात्या साळुंखे, बाळनाना साळुंखे , रमेश अनारसे, पत्रकार विष्णू देमुंडे, अमर साळुंखे, काकाजी अनारसे, डॉ अनिल गाडे, शिवाजीराव देशमुख, शिवाजीराव अनारसे मेजर, बाळासाहेब अनारसे, बापू पालवे रेवनाथ अनारसे, प्रा.सुरेश पालवे, काशिनाथ देवकाते, यासह तालुक्यातील व पंचक्रोशीतील भारतीय जनता पार्टीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.