दि.२२ फेब्रुवारी २०२३ रोजी सायंकाळी 5.55 मि श्री खोलेश्वर मंदिरापासून निघणार भव्य मिरवणूक

अपनी भाषा में पढ़े! Translate

करमाळा प्रतिनिधी (सागर गायकवाड) :- सालाबाद प्रमाणे ह्यावर्षी ही श्री खोलेश्वर महादेवाच्या नंदीची खांद्यावरुन सवाद्य भव्य मिरवणूक फाल्गुन शु. तृतिया दि. २२\०२\२०२३ रोजी सायंकाळी 5.55 मि श्री खोलेश्वर मंदिरापासून निघणार आहे असल्याची माहिती मंदीर समिती च्या वतीने देण्यात आली.
सदर मिरवणूक महादेव मंदिर किल्ला वेस येथून निघणार असून मिरवणुकीचा मार्ग किल्ला वेस, फुलसौंदर चौक, जय महाराष्ट्र चौक, गुजर गल्ली, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, दत्त पेठ, सुभाष चौक, राशीन पेठ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, ते किल्ला वेस महादेव मंदिर किल्ला वेस असा मार्ग असणार आहे. तसेच नंदीचे मानकरी व खांदेकरी व आरती मंडळाचे सर्व सदस्य व करमाळा शहरातील सर्व भाविक भक्त यांनी कार्यक्रमास उपस्थित रहावे व भाविक भक्तानी या मिरवणूकीसाठी सढळ हाताने मदत करावीअसे आवाहन खोलेश्वर आरती मंडळ करमाळा यांच्या वतीने करण्यात आले आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!