पुणे मेट्रो जंक्शन चे नामांतर क्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे करण्यात यावे यासह अनेक मागण्या घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे दौंड येथील लहुजी यंग ब्रिगेड संघटनेच्या शिष्टमंडळाने घेतली भेट
प्रतिनिधी – विकी ओहोळ
मो. नं. 844-611-91-58
दौंड : लहुजी यंग ब्रिगेडचे सचिव नितीन तुपसौंदर्य यांच्या नेतृत्वाखाली दौंड हून लहुजी यंग ब्रिगेड संघटनेच्या शिष्टमंडळाने मुंबई येथील वर्षा निवासस्थानी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच मा.मंत्री विजय शिवतारे यांची संदिच्छा भेट घेऊन मातंग समाजातील प्रलंबित विविध प्रश्नाबाबत निवेदन दिले. S.C आरक्षणातून मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळावे तसेच ‘अ.ब.क. ड’ नुसार वर्गीकरण करावे, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार मिळावा,
क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे आयोगाच्या शिफारशी मान्य करावे, क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे यांचे पुणे येथील संगमवाडी स्मारकाचे प्रलंबित असलेले काम तात्काळ सुरू करण्यात यावे, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे चिरागनगर,घाटकोपर येथील स्मारकाचे प्रलंबित काम तात्काळ सुरू करावे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण केंद्र पुणे च्या धरतीवर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण केंद्राची स्थापना करावी,
पुणे मेट्रो जंक्शन चे नामांतर करून क्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे असे करण्यात यावे,
क्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे यांचा विधान भवनासमोर पुतळा बसविण्यात यावा,
१ ऑगस्ट ला साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शासकीय सुट्टी जाहीर करण्यात यावी.
यावेळी लहुजी यंग ब्रिगेड संघटनेच्या वतीने क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांची प्रतिमा मा.मंत्री विजय शिवतारे यांना देण्यात आली.
यावेळी लहुजी यंग ब्रिगेड दौंड चे सचिव नितीन तुपसौदंर्य,निखिल ससाणे,अभिजीत शिंदे व इतर सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मातंग समाजातील सर्व प्रश्न तातडीने सोडवू असे लहुजी यंग ब्रिगेड संघटनेच्या शिष्टमंडळाला आश्वासन दिले.