June 29, 2025 10:52 pm

शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षेत 100 टक्के निकालाची परंपरा कायम..

अपनी भाषा में पढ़े! Translate

शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षेत 100 टक्के निकालाची परंपरा कायम..
प्रतिनिधी :- प्रा तुषार वाबळे
रयत शिक्षण संस्थेचे, भैरवनाथ विद्यालय भिगवणची शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षा 2022 मध्ये पुन्हा एकदा 100 टक्के निकालाची परंपरा कायम ठेवत विद्यालयाच्या शिरपेचात यशाचा तुरा लावण्याचे काम सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनीं केले आहे. यामुळे भिगवण पंचक्रोशीतील ग्रामस्थ व पालक यांच्याकडुन यशस्वी विद्यार्थी आणि मार्गदर्शक शिक्षकांचे कौतुक होत आहे.सदर परीक्षेचा निकाल खालील प्रमाणे 16 जानेवारी 2023 रोजी शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षेचा इंटरमिजिएट विभागाचा निकाल 100 % लागला असून, त्यामध्ये कु.कोकणी भावेश किरणकुमार, जाधव प्रज्योत नानासाहेब, दंगेकर यश संतोष या 03 विद्यार्थ्यांनी ए ग्रेड मिळून यश संपादन केले आहे. तसेच 19 जानेवारी 2023 रोजी एलिमेंट्रीचा निकाल जाहीर झाला असून,त्यामध्ये एकूण 19 विद्यार्थी सहभागी झाले होते . त्यात 16 पास 03 गैरहजर होते त्यात A श्रेणी मिळवून 10 विद्यार्थी व B श्रेणी मिळवून 06 विद्यार्थी असे यशस्वी झाले आहेत. एलिमेंट्री परीक्षेत A ग्रेड मिळवून कु. आवंतकर मानसी शहादेव , कु. भस्मे पायल मोहन कु.धुमाळ वैष्णवी राहुल ,कु.धुमाळ प्राची सुनिल, कु.गोरे शिवानी विश्वजीत, खरात प्रज्वल अण्णासो,मतीसे तलहा मोहसीन , कु.निकम स्नेहल गोकुळ , कु.थोरात प्रीती मनोज , खुरंगे अभिनव अर्जुन हे विद्यार्थी यशस्वी झाले.आहेत. B ग्रेड मिळवून दराडे किरण श्रीमंत, कु.कोनगे निवेदिता उदय , कु.मोटे तनुश्री अनिल ,शिर्के सागर संपत, कु.सूर्यवंशी सृष्टी दीपक यांनी यश मिळवलेले आहे.विद्यालयाची 100% निकालाची परंपरा विद्यार्थ्यांनी कायम ठेवली आहे.वरील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि त्यांना मार्गदर्शन करणारे विद्यालयाचे कलाशिक्षक श्री.ज्ञानेश्वर राऊत, श्री.सुनिल कचरे सर यांचे अभिनंदन आणि सन्मान विद्यालयाच्या पर्यवेक्षिका सौ.सोनवणे मॅडम तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री गावडे.एस.एम.तसेच स्थानिक स्कूल कमिटी , विद्यालयातील सर्व शिक्षक शिकेत्तर कर्मचारी व पालक वर्गातून होत आहे. त्याच बरोबर विद्यालयात त्यांचा गुलाब पुष्प देऊन सन्मान देखील करण्यात आला. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री गावडे एस.एम यांनी इतर विद्यार्थ्यानी देखील अशा स्पर्धा परीक्षेत सहभागी होऊन विद्यालयचे आणि आपल्या कुटुंबाचे नाव मोठे करावे हा संदेश दिला.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!