चंद्रपुर जिल्हा तेली समाजाचे शिक्षण क्षेत्रातील युवा कार्यशील , सुप्रसिद्ध नेतृत्व ,गोंडवाना विद्यापीठ सिनेट सदस्य प्रा.निलेश बेलखेडे, तेली समाजभूषण पुरस्काराने सन्मानित

अपनी भाषा में पढ़े! Translate

चंद्रपुर जिल्हा तेली समाजाचे शिक्षण क्षेत्रातील युवा कार्यशील , सुप्रसिद्ध नेतृत्व ,गोंडवाना विद्यापीठ सिनेट सदस्य प्रा.निलेश बेलखेडे, तेली समाजभूषण पुरस्काराने सन्मानित

प्रतिनिधी-विजय केळझरकर
चंद्रपुर जिल्हा तेली युवक मंडळ ,चंद्रपुर आयोजित मेळाव्यात जिल्ह्यातील मान्यवरांच्या हस्ते सत्कार
तेली युवक मंडळ जिल्हा चंद्रपूर आयोजित भव्य व़धु वर मेळावा २०२३ रोजी सत्कार सोहळ्यात शिक्षण क्षेत्रातील कार्यासाठी व सिनेट सदस्य निवडून आल्याबद्दल प्रा निलेश र बेलखेडे यांचा *समाजभूषण पुरस्काराने माजी मंत्री तथा विद्यमान आमदार विजयभाऊ वडेट्टीवारजी,चंद्रपुर विधानसभा आमदार किशोरभाऊ जोरगेवारजी, माजी आमदार भांडेकर जी, तेली युवक मंडळाचे अध्यक्ष खनके सर, तेली समाजाचे जेष्ठ नेते बबनरान फंडजी , श्री धनराज मुंगलेजी ,श्री बावणे जी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी संदर यशस्वी कार्यक्रमाबद्दल अभिनंदन व आयोजकांचे आभार मानतांना
प्रा निलेश र बेलखेडे यांनी समस्त तेली बांधवाचा ऋणी राहिल व हा सन्मान सदैव समाजकार्यासाठी प्रेरणादायी असून यापुढेहि असचं समाजातील शेवटच्या घटकापर्यंत समाज बांधवांची, युवा विद्यार्थी वर्गाना सहकार्य करण्यासाठी कटिबद्ध राहील असे मनोगत व्यक्त केले. यावेळी हजारोच्या वर तेली बांधव-भगिनींची उपस्थिती होती.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!