June 30, 2025 4:29 pm

ज्ञान संकल्प सामाजिक संस्था व कॅम कॉम्प्युटर ट्रेनिंग सेंटर दौंड तर्फे डी सी ए कोर्स उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव.

अपनी भाषा में पढ़े! Translate

ज्ञान संकल्प सामाजिक संस्था व कॅम कॉम्प्युटर ट्रेनिंग सेंटर दौंड तर्फे डी सी ए कोर्स उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव.
प्रतिनिधी- विकी ओहोळ
दौंड – ज्ञान संकल्प सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य आयोजित कॅम कॉम्प्युटर ट्रेनिंग सेंटर दौंड तर्फे विद्यार्थ्यांना संगणक साक्षरता अभियान अंतर्गत प्रमाणपत्र वाटप मा. माजी आमदार रमेश आप्पा थोरात यांच्या शुभहस्ते करण्यात आले संगणक क्षेत्रातील डीसीए या कोर्समध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले करण्यात आले कोर्समध्ये प्रथम क्रमांक आदित्य कोळसे द्वितीय क्रमांक सांस्कृतिक कुलकर्णी आणि तृतीय क्रमांक ओंकार मोरे यांना प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले या कोर्स मध्ये शंभरहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता त्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करून त्यांना गौरवण्यात आले यावेळी बहुजन वंचित आघाडीचे तालुका अध्यक्ष अश्विन वाघमारे,राष्ट्रवादी काँग्रेसचे दौंड शहराध्यक्ष गुरुमुख नारंग, सामाजिक न्याय विभाग राष्ट्रवादी काँग्रेस दौंड शहर अध्यक्ष दीपक सोनवणे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर गट दौंड तालुका अध्यक्ष सचिन खरात तसेच सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत थोरात इत्यादी मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित होते यावेळी संगणक शिकणे ही काळाची गरज आहे त्यासाठी आपल्याला संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे जो संगणक शकेल तोच स्पर्धेमध्ये टिकेल असे वंचित बहुजन आघाडीचे अश्विन वाघमारे यांनी विद्यार्थ्यांना अतिशय मोलाचा संदेश या कार्यक्रमाद्वारे दिला. तसेच या कार्यक्रमासाठी सुरेखा खरारे, तेजस मस्के ,अजीज शेख, यश पवार, रितेश यादव संस्थेच्या सचिव सौ. वैशाली रणदिवे व विद्यार्थ्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोलाचे सहकार्य केले. यावेळी सर्वांचे आभार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सदाशिव रणदिवे यांनी तर सूत्रसंचालन प्राध्यापक दिनेश पवार यांनी केले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!