तांदुळवाडी येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरी…

अपनी भाषा में पढ़े! Translate

तांदुळवाडी येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरी…
प्रतिनिधी : अजिनाथ कनिचे
माढा तालुक्यातील शेतकरी संघटना चौक तांदुळवाडी येथे राजमाता जिजाऊ जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. शुभांगी विलास जाधव, रोहिणी नागनाथ जाधव,लोचना अरुण गवळी,वनमाला बाबुराव गोसावी, सविता दत्तात्रय परबत,ऋतुजा शरद गवळी, दिपाली पांडुरंग गवळी यांच्या हस्ते प्रथम राजमाता जिजाऊ च्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जिजाऊ वंदना घेण्यात आली. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष आजिनाथ बापू परबत, छत्रपती संभाजी ब्रिगेडचे शांतीलाल गवळी, हनुमंत गवळी, नागनाथ जाधव, गणेश परबत, विजय परबत, राजेंद्र भोसले, रमेश गवळी, अतुल गवळी, मिलिंद जाधव, कांतीलाल पाटील, विष्णू अनपट, बंडू जाधव व ग्रामस्थ आदी मान्यवर उपस्थित होते.


तसेच जिल्हा परिषद आदर्श शाळेत सरपंच रणजितसिंह पाटील, उपसरपंच किरण गवळी, भाऊसाहेब केवटे, ग्रा. पं सदस्य अजिनाथ कनिचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विष्णू अनपट या मान्यवरांच्या हस्ते राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांचे प्रतिमा पुजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांचे विचार कथन केले. सोसायटीचे चेअरमन तथा पत्रकार अतुल गवळी यांनी स्वामी विवेकानंद यांचे विचार व जीवनातील प्रसंग तसेच राजमाता जिजाऊ एक आदर्श गुरु व आई होत्या यावरील प्रसंग कथन केले. शिक्षक प्रतापसिंह कदम यांनी विद्यार्थ्यांना स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या आदर्श गुणांची कास धरून, जीवनात आचरणात आणून आदर्श व्यक्तिमत्व होण्याचे शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कदम सर यांनी केले. संपूर्ण कार्यक्रम पार पाडण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक मनोहर वासकर सर, शिक्षक खटाळ सर, पल्लवी राक्षे मॅडम, ग्रा.पं. कर्मचारी अतुल परबत यांनी परिश्रम घेतले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!