कर्जत तालुका प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी योगेश गांगर्डे, सचिवपदी प्रा किरण जगताप
प्रतिनिधी.संदिप कायगुडे
कर्जत (प्रतिनिधी) : कर्जत तालुका प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी योगेश गांगर्डे, तर उपाध्यक्षपदी किशोर कांबळे, कार्याध्यक्षपदी भाऊसाहेब तोरडमल तर सचिवपदी प्रा किरण जगताप यांची बिनविरोध निवड करण्यात आली. प्रेस क्लब संस्थापक अध्यक्ष जेष्ठ पत्रकार महादेव सायकर यांच्या अध्यक्षतेखाली रेहकुरी येथे बैठक पार पडली. निवडीनंतर पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. बैठकीत निवडलेली कार्यकारिणी अशी : जिल्हा प्रतिनिधी – जेष्ठ पत्रकार विनायक चव्हाण, महादेव सायकर, सहसचिव सोमनाथ गोडसे, खजिनदार – अस्लम पठाण, सदस्य – संतोष रणदिवे, दादासाहेब शिंदे, विनायक ढवळे, मिलिंद राऊत. या बैठकीत मागील वर्षीच्या कामकाजाचा आढावा घेऊन पुढील वर्षातील उपक्रम, कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले. पुढील काळात विविध सामाजिक उपक्रम राबवून , सर्वसामान्यांच्या प्रश्नांना ज्ञाय देण्याचे काम कर्जत तालुका प्रेस क्लब कडून करण्यात येणार असल्याचे ठरले.