मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर परदेशातून आलेले दोन प्रवासी कोरोनाबाधित
प्रतिनिधी-अर्जुन आहेर
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर घेण्यात आलेल्या चाचणीत काल परदेशातून आलेले दोन प्रवासी कोरोना-बाधित आढळून आले. या चाचणीतील दोन्ही नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठवण्यात आल्याचे महाराष्ट्र राज्य शासनाच्या आरोग्य विभागानं सांगितलं आहे. दरम्यान, मुंबईमध्ये गेल्या तीन दिवसांत उपचाराधीन कोरोना रुग्णांमध्ये 32 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर कोविड संसर्गाची दैनंदिन संख्या 10 पेक्षा कमी आहे.
विशेष कक्ष तयार करून औषधांचा साठा तसंच प्राणवायू सुविधेची तयारी असल्यानं घाबरण्याची गरज नसून कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी 26 वेगवेगळ्या बाबींवर काम सुरु असल्याचं बृहन्मुंबई महानगरपालिकेनं म्हटलं आहे.