June 30, 2025 3:04 am

‘दबाव, दहशत केल्यास गय केली जाणार नाही, रेकॉर्ड वरील गुन्हेगार स्थानबद्ध:दिलीप पवार

अपनी भाषा में पढ़े! Translate

‘दबाव, दहशत केल्यास गय केली जाणार नाही, रेकॉर्ड वरील गुन्हेगार स्थानबद्ध:दिलीप पवार

(निलेश गायकवाड )

भिगवण पोलीस स्टेशनला च्या हद्दीतील घातलेल्या ग्रामपंचायत निवडणूक निर्विघ्न पार पडावी यासाठी भिगवण पोलिस यंत्रणा सज्ज झाली आहे. काेठेही गडबड, गोंधळ हाेऊ नये यासाठी अशा लाेकांवर पाेलिसांचे लक्ष राहणार आहे. पोलीस पोलीस स्टेशनंच्या हद्दीत तब्बल पाच अधिकारी,50 पोलीस अंमलदार,35 होमगार्ड, तसेच सी आर पी एफ चे जवान असा पोलिसांचा फौजफाटा बंदोबस्तासाठी राहणार आहे.

भिगवण पोलीस स्टेशनच्या हद्दीत एकूण 6 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी उद्या (रविवार) मतदान होत आहे. त्यासाठी बंदोबस्ताची योजना निश्चित करून यादी संबंधित पोलिस ठाण्यांना पाठविण्यात आली आहे.

आज नेमलेल्या ठिकाणी ईव्हीएमसह अधिकारी व अंमलदारांना बंदोबस्ताच्या कामी जावे लागणार आहे. दरम्यान उद्या मतदान होऊन ईव्हीएम मतमोजणी केंद्राच्या स्ट्राँग रूममध्ये पोहोच होईपर्यंत पोलिसांना तैनात रहावे लागणार आहे.

दरम्यान भिगवण पोलिसांच्या वतीने गावा गावात रूट मार्च काढून शांततेत मतदान करण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान यावेळी शांततेत मतदान करा, दबाव, दहशत आणि चुकीचा प्रकार सहन केला जाणार नाही असे मत भिगवण पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी बोलताना सांगितले आहे . प्रशासनाचे सर्व हालचालीवर लक्ष आहे. असाच संदेश या माध्यमातून देण्यात आला.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!