बारामती महाविदयलयीन कृषी दूतांनी गिरवले शेतकऱ्यांसाठी शेती मार्गदर्शनपर धडे
प्रतीनीधी.संदिप कायगुडे
कर्जत:- तालुक्यातील लोणी मासदपुर येथे डॉक्टर शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालय बारामतीतील कृषी दुत पंकज वाघ,तेजस सोळंके,प्रसाद ससाणे,अजित राजपूत,रोहित रामटेके,विशाल बागुल,सुनील सनक्के ,माधव रेड्डी, साई तेजा पाबत्ती यांनी ग्रामीण कृषी कार्यानुभव उपक्रमाअंतर्गत गावातील शेतकऱ्यांना कृषी विषयी मार्गदर्शन केले .त्यामध्ये त्यांनी पारंपरिक शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापर कसा करावा याचे धडे दिले. आपण घरी बसून मोबाईल ॲपद्वारे महाराष्ट्रातील हवामानाचा,बाजार भावाचा ,कृषी सल्ले ,खत उपलब्धता,औषध फवारनी,विविध शासन कृषी विषयक योजना इत्यादी चा लाभ कसा घेता येईल याचे मार्गदर्शन दिले.यावेळी लोणी मासदपुर गावातील उपसरपंच कचरू बनसोडे,दिलीप निंबाळकर, ज्ञानदेव निंबाळकर,बाबा घायतड,दत्ता निंबाळकर, दत्तू गरड, भैरू चव्हाण, किसन रामसिंग, बाळासाहेब निंबाळकर,रमेश रामदास होले,बापू कामडे,दादासाहेब गरड व सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीत व सहकार्याने हा कार्यक्रम पार पडला.