June 29, 2025 10:23 am

जिहादी नराधम आफताब ला फाशी तसेच लव्ह जिहाद विषयी कठोर कायदा व्हावा, हिंदु जागरण मंच, राष्ट्रीय स्वंयसेवक संघ च्या वतीने शिरपूर प्रांताधिका-यांना निवेदन

अपनी भाषा में पढ़े! Translate

शिरपूर – शिरपूर येथील प्रांताधिकारी कार्यालयात दिनांक २३.११.२०२२ रोजी सकाळी १०.३० वा. हिंदू जागरण मंच, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, राष्ट्र सेविका समिती, हिंदू विरांगना, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, हिंदू सेवा संघ, शिरपूर व समस्त हिंदू समाज शिरपूर तालुक्याच्या वतीने जिहादी नराधम आफताब पूनावाला व त्याच्या परिवारावर कठोर कार्यवाही तसेच लव्ह जिहाद विषयी कठोर कायदा करण्याबाबत निवेदन देण्यात आले.

एका हिंदू मुलीचे ३५ तुकडे करुन फ्रिज मध्ये ठेवणारा जिहादी अफताब हा राक्षस आहे. या राक्षसास व त्याच्या परिवारास कठोर शिक्षा झालीच पाहिजे. भारत माता की जय, वंदे मातरम च्या घोषणा देत हिंदू जागरण मंच व राष्ट्रीय स्वंयसेवक संघ, राष्ट्रसेविका समिती व विश्व हिंदू परिषद एबीव्हीपी चे कार्यकर्ते यांनी परिसर दणाणून सोडला. प्रसंगी शिरपूर चे प्राताधिकारी साहेबांना व शिरपूर पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक साहेबांना निवेदन देते प्रसंगी अॅड. गायत्री पाटील मॅडम यांनी निवेदनाचा पाठपुरावा करावा व महामहिम राष्ट्रपती पर्यन्त आपला संदेश साहेबांनी पोहचवावा असे आवाहन केले. संपूर्ण देशात रोज कुठे ना कुठे हया जिहादी मानसिकता असलेल्यांकडून हिंदू महिलांवर अन्याय अत्याचार, फसवणूक होतच आहे. हिंदू नाव धारण करुन ते हिंदू मुलींना फसवितात व नंतर त्यांचे धर्म परिवर्तन करण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणतात, त्यांना अमानुष मारहाण करतात. तरी सुध्दा त्यांचे दृष्टात्मा तृप्त होत नाही तर त्यांना मारुन त्यांचा नग्न देह कधी सुटकेस तर कधी फ्रीज मध्ये भरुन रस्त्याच्या कडेला, जंगलात फेकला जातो. अजुन किती श्रध्दांचे तुकडे आम्ही पाहवे असा भावनिक प्रश्न अॅड. गायत्री पाटील यांनी प्रांताधिकारी साहेबांसमोर उपस्थित केला.

या प्रसंगी हिंदू जागरण मंचचे धुळे जिल्हयाचे शशिकांत चौधरी, शिरपूर चे तालुका संयोजक, सुधीर सावळे, तालुका सहसंयोजक दिपक माळी, मनोज जैन, राकेश माळी, सचिनभाऊ सोनार तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अॅड. महेश वाघ, देविदास पाटील, मंगेश माळी, धर्म जागरण कैलास बाविस्कर विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचे, लक्ष्मीकांत जोशी, मनिष धाकड, राष्ट्रीय सेविका समितीच्या अॅड. गायत्री पाटील, सौ. राखी गजानन शर्मा, सौ. छाया किशोर दलाल, अॅड. गौरी महेश जोशी, हिंदू विरांगना अनिता आसाराम काळी, अर्चना प्रविण कोळी, आशा शशिकांत कोळी, मनिषा अविनाश कोळी, रक्षा सतिष कोळी, नंदिनी पुंडलिक कोळी, इंदुबाई बारकु कोळी, सुनिता छोटू कोळी, रुपाली सुनिल कोळी, अखिल भारती विद्यार्थी परिषदेचे नयन माळी, पृथ्वीराज लोहार सुदर्शन गौ सेवा संघाचे, नवगण भरवाड, किसान संघाचे दत्तु माळी, हिंदू सेवा संघाचे सुनिल सुर्यवंशी, किशोर माळी तसेच योगेश माळी, भावेश चौधरी, उमेश ईशी, ओ.एम.. मराठे, हंसराज चौधरी, महेंद्र राजपूत, दिलीप खेमचंद चौधरी, रविंद्र चौधरी शरद वामनराव कासार, रामसिंग राजपूत, बळीराम शेटे, कुणाल भावसार, किशोर मराठे, मनिष जाधव, दिपक जाधव, नरेंद्र जाधव, ऋषिकेश जाधव, करण बंजारा, परेश महाजन, साहिल चौधरी, अक्षय जाधव, पार्थ पाटील, किशोर माळी, सुनिल चौधरी, आदित्य जव्हेरी, दिनेश पाटील, नामदेव पाटील, आबा बडगुजर, गोपाल सोनार, नितीन चौधरी, काशिनाथ चौधरी, रामचंद्र पवार, विजय पवार, पार्थ राजपूत, किरण चौधरी, किश राजेंद्र माळी, ह.र.कदम, सागर महेंद्र शिंदे, मयुर रामकृष्ण ठाकरे, यश बाळू सनेर, चेतन साळुंखे, शुभम बाविस्कर, कपिल बाविस्कर व इतर अनेक हिंदू समाजातील ज्येष्ट व श्रेष्ट व्यक्ती उपस्थित होते.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!