धरणगाव : श्रीं.एकनाथ चौधरी साहेब सहा-गटविकास अधिकारी पंचायत समिति अमळनेर तथा गटविकास अधिकारी पंचायत समिति यावल यांचे अपघाती शासकीय कामासाठी नाशिक जातांना धरणगांव जवळ दुखद निधन झाले.
शहाराजवळ सुमारे 2 किलोमीटर अंतरावर सकाळीच साडेपाचच्या सुमारास भीषण अपघात झाला असून त्यात अमळनेर पंचायत समितीचे सहायक गट विकास अधिकारी तथा यावल पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी एकनाथ चौधरी हे जागीच ठार झाले आहेत. तर त्यांच्या गाडीचा चालक जखमी झाला आहे.
दरम्यान धरणगाव ग्रामीण रुग्णालयात शव नेण्यात आले असून फिर्याद दाखल करण्याचे काम धरणगाव पोलिसात सुरू आहे.