June 30, 2025 3:48 am

दिंडी निघाली शेगांवला….

अपनी भाषा में पढ़े! Translate

दिंडी निघाली शेगांवला….

वाजत गाजत, शिस्तबद्ध पद्धतीने दिंडींचे नियोजन

अमळनेर प्रतिनिधी- अमळनेर ते शेगांव पायीवारी आज दिनांक २९ ऑक्टोबर 2022 रोजी शेगांवला शिस्तबद्ध पद्धतीने रवाना झाली. सकाळी पाच वाजता गजानन महाराज मंदिर दादासाहेब जी.एम सोनार नगर अमळनेर येथून पायी वारीची सुरुवात झाली व सकाळी पाच वाजता महाआरती मंदिरात करण्यात आली.
सविस्तर माहिती अशी कि सकाळी गजानन महाराज यांचे पादयपूजन करण्यात आले. यावेळी वारीप्रमुख आर.बी.पवार सर,
सौ ज्योती पवार,नितीन भावे,अशोक भावे,रघूनाथ पाटील सह उपस्थित होते.
29 ऑक्टोबरला निघालेली पायीवारी 3 नोव्हेंबरला शेगांवला पोहोचणार आहे. पायीवारीतील गजानन भक्तांना सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण, रात्रीचा मुक्काम व जेवन याची सर्व व्यवस्था गजानन फक्त व सामाजिक कार्यकर्ते ,व संस्थांचे पदाधिकारी यांनी केले आहे. अमळनेर येथील दादासाहेब जीएम सोनार नगर येथून निघालेली पायीवारी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने सर्व गजानन भक्त दिंडीतील नाचत गाजत जात वातावरण गजाननमय झाले होते. रस्त्यात अनेक कॉलनीमध्ये महिला मंडळांनी सळा रांगोळी काढत दिड्डीचे स्वागत केले.गजानन शेगांव पायी वारीला अनेक पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, भावीक यांनी भेट देत गजानन महाराजांचा आशीर्वाद घेतला. या पायी वारीचे दहावे वर्ष आहे. अनेक भाविक वृद्ध यात स्वखुशीने सहभागी झाले.
यावेळी अमळनेर तालुक्यातील मारवड, पातोंडा,खापरखेडा, करणखेडा,भिलाली, कोळप्रिपीं,पिंगळवाडे,मुसळी,अमळगांव, तामसवाडी, सात्री,डांगरीसह अनेक
ग्रामीण भागातील गजानन भक्त पायी दिंडीत सहभागी झाले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!