June 29, 2025 10:52 pm

उत्कृष्ट रांगोळी रेखाटनाचे ग्रामस्थांनी केले कौतुक…

अपनी भाषा में पढ़े! Translate

उत्कृष्ट रांगोळी रेखाटनाचे ग्रामस्थांनी केले कौतुक…
प्रतिनिधी:- प्रा. तुषार वाबळे
नुकत्याच झालेल्या नवरात्र महोत्सवात शेटफळगडे गावचे ग्रामदैवत श्री जानाई देवी मंदिरात नवरात्र महोत्सव मोठ्या थाटात साजरा करण्यात आला.यावेळीशेवटी होम हवन आणि देवी अभिषेक याप्रसंगी जानाई मंदिर मध्ये उत्कृष्ट रांगोळी रेखाटन कलेचे सादरीकरण करत. गावातील कुमारी शिवानी संजय झगडे या रयत शिक्षण संस्थेचे, श्री नागेश्वर विद्यालय व ज्युनिअर कॉलेज शेटफळगडे येथे शिकत असणाऱ्या विद्यार्थिनीने जानाई देवीची हुबेहूब रांगोळी रेखाटून सर्वांच्या कौतुकास पात्र ठरली.यावेळी रयत शिक्षण संस्था साताराचे जनरल बॉडी सदस्य, कृषी उत्पन्न बाजार समिती इंदापूरचे माजी सभापती श्री हनुमंतराव पांडुरंग वाबळे यांच्या हस्ते शिवानीचा सन्मान करण्यात आला. यावेळी प्रा. श्री गजानन ज्ञानदेव झगडे , सामजिक कार्यकर्ते श्री.अमोल झगडे आणि तिचे कुटुंबीय उपस्थीत होते.तिला सर्वांनी भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!