June 29, 2025 11:01 am

हाडाखेड ता. शिरपूर आर.टी.ओ. चेक पोस्ट बंद करुन बेकायदेशिर पेशांची लुटमार थांबवा – शिवसेना वाहतूक सेना धुळे जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील

अपनी भाषा में पढ़े! Translate

सीमा तपासणी नाके बंद करणे बाबत वरील संदर्भीय आदेश पास करुनही बेकायदेशिर रित्या व शासनाचा आदेश धाब्यावर बसवुन त्याची अंमलबजावणी न करता, केवळ बेकायदेशिर धंदे सुरु रहावेत व बेकायदेशिर वाहनांकडुन बेकायदेशिर पैशांची अफाट लुटमार करण्यासाठी सुमारे एक ते दिड महीना आदेश होवुनही हाडाखेड येथील सीमा तपासणी नाका अद्याप सुरु आहे व तेथील आर.टी.ओ. तसेच आर.टी.ओ.चे पन्टर व इतर खाजगी बेकायदेशिर नाक्यावर ठेवले तोडेपीर हे बेकायदेशिर पैशांची वसुली करीत आहे. त्यामुळे काही वाहन चालकांना फारच त्रास होतो व त्या बात आम्हास वाहन चालकांच्या तक्रारी येत असतात. हाडाखेड सीमा तपासणी नाका हा महाराष्ट्र व मध्य प्रदेश या दोन राज्यांना जोडणारा नाका असुन मध्य प्रदेशातुन येणारे गुरांच्या गाडया, (बैल, म्हशी, गायी, गो-हे तसेच बकरे) यांची सर्रास वाहतुक होते व त्यावर कोणताही निर्बंध न लावता कत्तलीसाठी जात असलेले वाहने मोठी रक्कम घेवुन सोडले जातात व अवजड वाहनांची देखील (ओव्हरलोड) १२ टायर ५०० रुपये, १४ टायर-७००/ रुपये १६ टायर, ९००/- रुपये १८ टायर- ११०० /- रुपये तर मोठ मोठे कन्टेंर पास होण्यासाठी २०००/- – २०००/- हजार रुपये दिले जावुन वाहने सोडले जात असतात. महाराष्ट्रात अशी अनेक सीमा तपासणी नाके असुन त्यातुन भरमसाठ बेकयदेशिर पैसा वसुल केला जात असल्याचे शासनाचे निदर्शनास आल्याने, महाराष्ट्र शासनाने वरील संदर्भीय जी. आर. (परिपत्रक) पास केले असुन, तसे सर्व प्रादेशिक कार्यालयांना सुचना ही देण्यात आल्या आहेत तरी देखील हाडाखेड चेक पोस्ट सिमा तपासणी नाका, हाडाखेड ता. शिरपूर जि. धुळे हे नाका अद्याप सुरु असुन त्यातून बेकायदेशिर पैशांची लुटमार होत आहे.तरी हाडाखेड येथील सीमा तपासणी नाका त्वरीत बंद करण्यात यावे अन्यथा शासनाच्या पत्रा नुसार आंदोलन छेडण्यात येईल व होणारे परिणामास प्रादेशिक कार्यालय जबाबदार राहील.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!