आ.रोहित पवारांच्या माध्यमातुन 31 महिला बचत गटांना 31 लाख रु. कर्ज युनियन बँकेच्या वतीने वेगवेगळ्या व्यवसायासाठी वितरीत
प्रतिनिधी.संदिप कायगुडे
कर्जत:कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्था व युनियन बँक ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महिला मेळाव्यात आज 31 महिला बचत गटांना 31लाख रु. कर्ज युनियन बँकेच्या वतीने वेगवेगळ्या व्यवसायासाठी वितरीत करण्यात आले.
यावेळी कर्जत जामखेड विधानसभा म्हणून आमदार मा.रोहितदादा पवार व श्री.अश्वनिकुमार सिन्हा उपमहाप्रबंधक युनियन बँक यांनी उपस्थित महिलांना व्यवसायाचे मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाला युनियन बँकेचे अधिकारी सर्वेशकुमार ,बापूसाहेब सुपेकर,महेशकुमार कात्रजकर,अनिल बुट्टे तसेच माधुरीताई लोंढे,अमृता वाघमारे सरपंच खेड व मान्यवर महिला यावेळी उपस्थित होत्या…

लोकप्रतिनिधी या नात्याने कर्जत,जामखेड येथे आ.रोहित पवारांची लोकविकासाची अनेक कामे चालू आहेत.याशिवाय महिला सक्षम व्हावी यासाठी चालू असलेली त्याची धडपड माझ्यासाठी अभिमानास्पद बाब आहे.या वर्षात केवळ महिला व्यावसायिक सक्षम व्हावी या हेतूने 3 कोटी रु. महिला उद्योगांसाठी वेगवेगळ्या बॅंका व संस्थांच्या निधीतून कर्ज स्वरूपात वितरण करून अनेक महिलांच्या हाताला लहान मोठे काम दिले आहे.भीमथडी जत्रेच्या माध्यमातून महिलांच्या हाताला काम मिळावे,कुटुंबाला आर्थिक मदत व्हावी त्यांचा आत्मविश्वास वाढला पाहिजे यासाठी 2 वर्षांपासून कर्जत जामखेड भागातील अनेक महिलांना व्यासपीठ देण्याचे काम करत आहे.निवडणुकांच्या काळात दिलेले अनेक शब्द आज खरे होताना आपण डोळ्याने पाहत आहोत. एक एक आई म्हणून निश्चित मला अभिमान आहेच .याशिवाय मतदारसंघातील सामाजिक,शैक्षणिक,पशु,शेती,पाणी,महिला सबलीकरण,शेतकरी अशा वेगवगेळ्या विकास कामांचा आढावा सांगितला यातून आ. रोहित पवारांच्या कामांचा आवाका किती मोठा आहे याची जाणीव नक्कीच येईल. यापुढेही काम जोमाने चालू राहील यात मला शंका नाही…