देशाच्या सर्वोच्चपदी प्रथमच एका आदिवासी महिलेला संधी दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार -आ. पावरा
शिरपूर : देशाच्या राष्ट्रपती पदावर श्रीमती द्रौपदी मुर्मू यांची निवड झाल्याबद्दल शिरपूर येथील पाच कंदील चौकात फटाके वाजवून आणि पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. भाजपा प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी, आ. काशिराम पावरा यांचा नेतृत्वाखाली भाजपा कार्यालय ते विजय स्तंभमार्गे, आंबा बाजार, परत भाजपा कार्यालय पर्यंत जल्लोष करण्यात आला. भाजपा प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी म्हणाले की, भारतातील व्यक्ती राष्ट्रपतीपदी देशात आतापर्यंत आदिवासी समुदायातील कोणीही व्यक्ती राष्ट्रपती बनलेला नाही. महिला, दलित, मुस्लीम आदी विराजमान झालेले आहेत. पण आदिवासी समाज यापासून वंचित राहिला होता. त्यामुळे आदिवासी समाजातील व्यक्तीला राष्ट्रपती होण्याचा बहुमान मिळावी अशी मागणी केली जात होती. आता द्रौपदी मुर्मू यांच्या माध्यमातून ही गोष्ट साध्य झाली आहे. द्रौपदी मुर्मू या ओडिशातील आदिवासी नेत्या आहेत. ओडिशातील सरकारमध्ये त्या मंत्री होत्या. त्यांनी झारखंडच्या राज्यपाल म्हणून देखील काम केलं आहे. द्रौपदी मुर्मू या ओदिशाच्या रायरंगपुर मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आल्या होत्या.

आदिवासी कुटुंबात त्यांचा जन्म झाला आहे. त्यांनी शिक्षिका म्हणुन काम केले आहे. नगर पंचायतीत नगरसेवक, आमदार, राज्यपाल म्हणुन काम केले आहे. तर आता राष्ट्रपती म्हणुन विराजमान झाल्या असलेल्याचे सांगितले. आ. काशिराम पावरा म्हणाले कि, देशाच्या १५ व्या राष्ट्रपती म्हणून भारतीय जनता पार्टी व मित्रपक्षाचे उमेदवार श्रीमती द्रौपदी मुर्मू यांची निवड झाली. देशाच्या सर्वोच्चपदी प्रथमच एका आदिवासी महिलेला संधी दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा राष्ट्रीयाध्यक्ष जे पी नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तसेच भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेत्यांचे विशेष आभार व्यक्त करतो. तसेच मुर्मू यांनीनी दलित‚ आदिवासी यांच्या सेवेत स्वतःला झोकून दिले. स्वतःचे दुःख जगाच्या दुखात मिसळून टाकले आहे. झारखंडच्या पहिल्या महिला राज्यपाल म्हणून हि पाच वर्षे काम केले असे त्यांनी सांगितले. याप्रसंगी धुळे भाजपा जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, शिरपूर तालुकाध्यक्ष किशोर माळी, शहराध्यक्ष हेमंत पाटील, जिल्हा चिटणीस चंद्रकांत पाटील, ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील, भाजपा आदिवासी आघाडी जिल्हाध्यक्ष रमण पावरा, बाराबलुतेदार महासंघ उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष एकनाथराव बोरसे, शिसाका संचालक जयवंत पाडवी, भाजपा भटक्या विमुक्त आघाडी प्रदेश सदस्य रविंद्र भोई, ओबीसी मोर्चा जिल्हा सरचिटणीस संजय आसापुरे, तालुका चिटणीस सुनिल चौधरी, माजी पं. स. सदस्य छगन गुजर, भाजपा शहर सरचिटणीस महेंद्र पाटील, शहर चिटणीस राधेश्याम भोई, अविनाश शिंपी, अल्पसंख्यक मोर्चा जिल्हा सरचिटणीस मुबीन शेख, जितेंद्र पाटील, शिंगावे विकासो चेअरमन संजय पाटील, युवा मोर्चा शहराध्यक्ष विक्की चौधरी, शहर उपाध्यक्ष अनिल बोरसे, श्रीकृष्ण शर्मा, बाराबलुतेदार महासंघ जिल्हा कार्याध्यक्ष प्रकाश गुरव, शहराध्यक्ष रमेश चौधरी, रविंद्र सोनार, रफीक तेली, बुथ प्रमुख कुणाल माळी, जगन्नाथ पाटील, रविंद्र राजपुत यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरीक आणि आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.