बोराडी: देशाच्या राष्ट्रपती पदावर श्रीमती द्रौपदी मुर्मू यांची निवड झाल्याबद्दल बोराडी येथील छत्रपती शिवाजीचौकात फटाके वाजवून आणि पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. आत्मनिर्भय भारतचे धुळे जिल्हाध्यक्ष श्री राहुलजी रंधे ,भाजप आदिवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष श्री रमणजी पावरा, शिसाका संचालक श्री जयवंतजी पाडवी यांचा नेतृत्वाखाली जल्लोष करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्या जताबाई रमण पावरा, पंचायत समिती सदस्या सरिता विशाल पावरा ,ग्राम पंचायत कोडीदचे सरपंच भरत पावरा, ग्राम सदस्य वासुदेव सतेसा, जिजाबराव पाटील ,गुलाब मालचे ,विशालभाऊसाहेब पावरा , बिरसा ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष भरत पावरा बबन पाटील ,कर्मवीर मेडिकलचे संचालक जाधव यांच्यासह बोराडी ग्राम पंचायत सदस्य व पदाधिकारी, कार्यकर्ते नागरीक आणि आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.