June 30, 2025 10:13 am

मंद्रुप पोलिसांची संवेदनाशील सतर्कता अन् ती घरी सुखरुप पोहचली.

अपनी भाषा में पढ़े! Translate

मंद्रुप पोलिसांची संवेदनाशील सतर्कता अन् ती घरी सुखरुप पोहचली.
✍️ नंदकुमार वारे.
रात्रीचे एक वाजले होते. चोहोबाजूनी भयाण अंधार पसरला होता. अशातच कामती मंद्रूप हायवे रस्त्यावरुन ती अल्पवयीन मुलगी एकटीच चालत निघाली होती. याच हायवेवरुन मंद्रुप पोलिसांची वायरलेस गाडी सायरन वाजत निघाली होती. वायरलेस सायरनचा आवाज कानी पडताच ती रस्त्याच्या कडेला निमुटपणे उभी राहिली. मंद्रुपचे सहाय्यक पोलिस निरीक्षक रविंद्र मांजरे हे आपल्या साथीदारसह गाडीतून खाली उतरले. तिला विश्वासात घेऊन माहिती घेतली असता ती मोहोळ तालुक्यातील कामतीजवळील हराळवाडी येथुन रात्री साडे अकरा वाजता एकटीच चालत निघाली असल्याचे सांगितले.रात्रीच्या भयाण अंधाऱ्यात हायवे रस्त्यावर निर्मनुष्य ठिकाणी ती एकटीच उभी असल्याने येणाऱ्या जाणाऱ्या वाहने लुटण्यासाठी लुटारुच्या टोळीने ट्रॅप लावला असेल अशी शंका पहिल्यांदा मंद्रुप पोलिसांना आली. यासाठी प्रारंभी मंद्रुप पोलिसांनी बॅटरीच्या प्रकाशात आजूबाजूचा परिसर तपासले असता त्या ठिकाणी असे काही प्रकार आढळून आले नाही.तिच्याकडूनच अधिक चौकशी केली असता सत्य प्रकार उघडकीस आला. तिला एका मुलासोबत
लग्न करायचे आहे. घरच्यांचा तिला विरोध आहे म्हणून ती हराळवाडी येथे राहणाऱ्या आजी आजोबा घरातून आपल्या प्रियकर असलेल्या मुलाला भेटण्यासाठी निघाली होती. तिच्याकडील मोबाईल चेक केला असता तिची बहीण ऑनलाईन दिसली लागलीच पोलिसांनी बहिणीला कॉल करून ही सुरक्षित असल्याचे सांगत कामती पोलिस स्टेशनला येण्यास सांगितले. मंद्रुप पोलिसांच्या संवेदनाशील सतर्कतेमुळे एक अल्पवयीन मुलगी तिच्या नातेवाईकांकडे सुखरुपपणे पोहचली. ही सतर्कतेची कामगिरी मंद्रुपचे सहाय्यक पोलिस निरीक्षक रवींद्र मांजरे.
पोलिस नाईक श्रीकांत बुरजे
चालक पोलिस शिपाई . बालाजी नागरगोजे यांनी बजावली.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!