June 30, 2025 3:21 am

रोटरी क्लब भिगवन तर्फे डॉक्टर्स डे साजरा;रोटरी क्लब भिगवनच्या अध्यक्षपदी डॉ.अमोल खानावरे यांची निवड

अपनी भाषा में पढ़े! Translate

रोटरी क्लब भिगवन तर्फे डॉक्टर्स डे साजरा;रोटरी क्लब भिगवनच्या अध्यक्षपदी डॉ.अमोल खानावरे यांची निवड

(निलेश गायकवाड )

रोटरी क्लब भिगवन तर्फे एक जुलै तसेच रोटरी चे नवीन वर्ष चालू झाले असताना डॉक्टर्स डे निमित्त भिगवन मधील सर्व डॉक्टरांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन साजरा करण्यात आला…. एक जुलै पासून रोटरी चे नवीन वर्ष चालू होते त्यातच दुग्ध शर्करा योग म्हणजे रोटरी क्लब भिगवनच्या अध्यक्षपदी आता डॉ.अमोल खानावरे यांची निवड झाली…


कार्यक्रमासाठी डॉक्टर संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर संकेत मोरे,गव्हर्नर डॉक्टर अतुल कोठारी, डॉक्टर चंद्रकांत खानावरे तसेच रोटरी चे संस्थापक अध्यक्ष सचिन बोगावत, संपत बंडगर, महेश शेंडगे, कमलेश गांधी, माजी अध्यक्ष संजय खाडे, सचिव सौ वैशाली बोगावत,बिल्ट ग्राफिक्सचे धरनेंद्र गांधी साहेब इत्यादी उपस्थित होते… यावेळी बोलताना अध्यक्ष डॉक्टर अमोल खानावरे म्हणाले की रोटरी चे नवीन वर्ष चालू झाले असताना माझी अध्यक्षपदी निवड झाली व या कालावधी मधील पहिला कार्यक्रम डॉक्टरांचा सन्मान करून त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात येत आहे… डॉक्टर संकेत मोरे म्हणाले की रोटरी क्लब बरोबर भिगवन डॉक्टर असोसिएशन तर्फे येणाऱ्या काळात विविध आरोग्यावरील शिबिरे घेण्यात येतील.. यावेळी सचिन बोगावत, महेश शेंडगे, धरनेंद्र गांधी,यांनी मनोगत व्यक्त केले… यावेळी भिगवन मधील सर्व डॉक्टरांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला… कार्यक्रमाचे नियोजन खजिनदार संतोष सवाणे,रियाज भाई शेख, औदुंबर हुलगे,सौ स्वप्ना गांधी ,सौ सारिका सवाणे,सौ नीलिमा बोगावत, सौ रेखा खाडे,सौ मीनाताई बंडगर, डॉ. शिवराणी खानावरे यांनी केले तर आभार उपाध्यक्ष किरण रायसोनी यांनी मानले…

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!