June 30, 2025 10:13 am

पक्षादेश झुगारुन शिवसेनेच्या ३९ आमदारांचं नार्वेकरांना मतदान

अपनी भाषा में पढ़े! Translate

पक्षादेश झुगारुन शिवसेनेच्या ३९ आमदारांचं नार्वेकरांना मतदान
(निलेश गायकवाड)

शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटातल्या आमदारांनी व्हिप झुगारुन राहुल नार्वेकर यांना मतदान केलं. या मतदानाचं व्हिडीओ चित्रीकरण जतन करुन ठेवावं आणि या आमदारांची नावं नोंदवून ठेवण्याचे आदेश, झिरवळ यांनी दिले. शिवसेनेचे गटनेते अजय चौधरी यांनी ही मागणी केली होती.

विधानसभेच्या दोन दिवसीय विशेष अधिवेशनाचं कामकाज आज सकाळी ११ वाजता सुरू झालं. नवीन मंत्री आणि नव्या विधानसभा सदस्यांची ओळख झाल्यावर आवाजी मतदानानं अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याची घोषणा झिरवळ यांनी केली. मात्र सदस्यांच्या मागणीवरुन मतविभाजन पद्धतीनं हे मतदान घेण्यात आलं.

मतदान सुरू होण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील म्हणाले, आम्ही वारंवार ही निवडणूक घेण्याची विनंती करत होतो. ती आता मान्य केल्याबद्दल राज्यपालांचे आभार. राज्यपालांनी आता विधानपरिषदेसाठी आम्ही पाठवलेल्या १२ आमदारांचीही यादी मंजूर करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!