शिरपूर: आज दि.२५/६/२०२२ रोजी मा.उद्धव साहेब ठाकरे यांच्या समर्थनार्थ शिवसैनिक एकवटले आरे हा त्यागातुन मिळालेला वारसा आहे.त्यागातुन मिळालेल्या धाडसापुढे वादळ येतील आणि जातील यांची चिंता नाही.सामाजीक राजकीय जीवनातील संघर्षाची ठाकरे घराण्याची ही चौथी पिढी आहे.शिवसेना हा पक्ष नसुन हा वंदनीय बाळासाहेबांनी दिलेला हा एक विचार आहे.पक्ष संपत असतात पण विचार कधी संपत नाही..म्हणून कोणत्याही परिस्थितीत मग सत्ता असो या नसो आम्ही सर्व शिवसैनिक शिवसेना पक्षप्रमुख मा.श्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या सोबत आहोत.
यासाठी चला शिरपूर तालुक्यातील आजी माजी शिवसेना, युवासेना व सर्व अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी व शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून.मा उद्धवजी ठाकरे साहेब व आदित्य साहेब ठाकरे यांना समर्थनार्थ शक्ती प्रदर्शन करून वज्रमूठ धारण केले तेव्हा शिरपूर विधानसभा तर्फे समर्थन करण्यात आले.तेव्हा उपजिल्हा प्रमुख-भरतभाऊ राजपूत यांनी शिवसेना ही संघर्षातुन गेलेली संघटना आहे या पूर्वी देखील शिवसेना संपवणारे संपले मात्र शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने आज पण जिवंत आहे आणि राहणार आम्ही सर्व शिरपूर विधानसभा क्षेत्राच्या वतीने सर्व शिवसैनिक उद्धव साहेबांना समर्थन करण्यात आले.तसेच सर्व शिवसैनिकांनी टरबूज फोडून निषेध केले.त्यावेळी उपजिल्हा संघटक विभाभाई जोगराणा,माजी जिल्हा प्रमुख हिंमतसिंग महाजन,विधानसभा क्षेत्र प्रमुख छोटुसिंग राजपूत,तालुका प्रमुख दिपक चोरमले,अत्तरसिंग पावरा,तालुका संघटक योगेश सूर्यवंशी, शहर प्रमुख मनोज धनगर,समन्वयक देवेंद्र पाटील,संघटक प्रेम कुमार चौधरी,उपतालुका प्रमुख अभय भदाणे,मंगलसिंग भोई,सुकलाल पावरा,सुनिल मालचे,स्वरूपसिंग पावरा,उपशहर प्रमुख बंटी लांडगे,योगेश ठाकरे,इंद्रिस शहा,रेहान सर,वाजिद मलक,माजी तालुका संघटक मुकेश शेवाळे,पिंटू शिंदे,रवींद्र जाधव,युवासेना उपजिल्हा युवाधिकारी तालुकाधिकारी विजय पावरा,उपतालुकाधिकारी जितेंद्र राठोड,राहुल पावरा, जगदीश पावरा,बबलू शेख,दिनेश गुरव,मंगल पावरा,युवासेना सचिव सचिन शिरसाठ,महा.वा.सेना जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटिल,शिवसेना संपर्क कार्यालय, पोस्ट ऑफिस समोर समर्थन करण्यात आले.