शिरपूर: शिरपूर एज्युकेशन सोसायटी संचलित वाघाडी ता.शिरपूर येथील जयश्रीबेन अमरीशभाई पटेल सी.बी.एस. ई स्कूलमध्ये मंगळवार ,२१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस मोठया उत्साहाने साजरा करण्यात आला. जगाला आनंदित करूया चला योगाकडे जाऊया उत्तम आरोग्य ही सर्वात मोठी भेटवस्तू आहे आणि ती केवळ व्यायामामुळेच मिळते . उत्तम आरोग्याचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावे या उद्देशाने जयश्री बेन अमरिशभाई पटेल स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला.

कार्यक्रमात शाळेच्या उपमुख्याध्यापक मा. मेघा मॕडमनी सर्वांना आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या सर्वांना शुभेच्छा व संदेश दिला. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त ओमकार मंत्राने कार्यक्रमाची सुरुवात झाली त्यानंतर विद्यार्थ्यांनी सूर्यनमस्कार केले. विविध प्राणायाम जसे अनुलोम-विलोम , कपालभाती तसेच विविध योगासने विद्यार्थ्यांनी केले . क्रीडाशिक्षक सचिन सरांनी योगासनाचे फायदे विद्यार्थ्यांना सांगितले. कारक योग दिनाच्या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले व सहभाग नोंदवला. अशाप्रकारे आंतरराष्ट्रीय योग दिवस हर्ष व उल्हासात शाळेत साजरा करण्यात आला.