भिगवण येथे भाजपा युवा मोर्चाच्या वतीने राज्यसभेपाठोपाठ विधान परिषदेचेही मैदान जिंकल्याने जल्लोष-तेजस देवकाते
(निलेश गायकवाड )
देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपने राज्यसभेपाठोपाठ विधान परिषदेचेही मैदान जिंकले. विधान परिषद निवडणुकीत भाजपच्या पाचही उमेदवाराचा विजयी झाला. देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा चमत्कार करत महाविकास आघाडीला जोरदार धक्का दिलाय. या विजयानंतर माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष तेजस देवकाते व भिगवण येथील कार्यकर्त्यांनी प्रभू श्रीरामाच्या प्रतिमेचे पूजन करून फटाके फोडून नेत्यांनी एकच जल्लोष केला.

यावेळी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारणी सदस्य मारुती वनवे, शिवाजीराव भुजबळ,अशोक शिंदे,संपत बंडगर,पराग जाधव,यशवंत वाघ,संदीप खुटाळे, तुषार क्षीरसागर,दिनेश मारणे, माऊली मारकड,राकेश खटके,गणेश खडके,विश्वास देवकाते, अरविंद देवकाते,सतीश काळे प्रशांत वाघ,सुनील काळे, श्रीकांत काशीद, युवराज काळंगे याच बरोबर अनेक तरुण युवक उपस्थित होते.
ना.देवेंद्र फडणवीस साहेब तसेच श्री.चंद्रकांत दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा एकदा भाजपचा मोठा ऐतिहासिक विजय झाल्याचे मत तेजस देवकते यांनी व्यक्त केले.