June 30, 2025 3:18 am

चहाविक्रेते मुलाने दहावीमध्ये मिळवले 70 टक्के गुण..

अपनी भाषा में पढ़े! Translate

मा.श्री. विजयकुमार परीट यांच्या हस्ते सत्कार स्वीकारताना फळविक्रेता विद्यार्थी समर्थ रमेश पवार.

चहाविक्रेते मुलाने दहावीमध्ये मिळवले 70 टक्के गुण..

गटविकास अधिकारी यांनी केला सत्कार..

इंदापूर प्रतिनिधी – आदित्य बोराटे

मागील आठवड्यात महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाकडून इयत्ता दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला.तुमच्या मुलाला 70 टक्के गुण मिळाले,असे सांगताच त्यांच्या तोंडून शब्दच निघाले नाहीत. ते भावुक झाले. डोळ्यातले पाणी लपवत, कातरत्या आवाजात म्हणाले, श्रमाचे फळ मिळाले.त्यांचा मुलगा समर्थ पवार ह्याने घराच्या जेमतेम स्थितीवर मात करीत दहावीच्या परीक्षेत 70 टक्के गुण घेतले.

इंदापूर पंचायत समिती समोर रमेश पवार यांचा चहा विक्रीचा व्यवसाय आहे.त्यांचा मुलगा समर्थ रमेश पवार याने शाळेच्या वेळेव्यतिरिक्त त्याचे वडील रमेश पवार यांना चहाविक्री करिता मदत करत,प्रयत्न केल्याने काहीही होऊ शकते हे पुन्हा सिद्ध झाले. परिस्थिती कशी असो,मनात आलेला विचार आणि स्वत:वर असलेला आत्मविश्वास तुम्हाला थांबवू शकत नाही.अशाच प्रकारची जिद्द समर्थने ठेवली.समर्थ हा श्री.नारायण रामदास हायस्कूल शाळेचा विद्यार्थी. समर्थ म्हणाला,आई आणि वडिलांचे कष्ट डोळ्यासमोर ठेवून मनाशी निश्चय करूनच अभ्यासाला बसायचो. शाळा, शिकवणी वर्गातून मिळालेल्या वेळात केवळ आणि केवळ अभ्यास करायचो.उजळणीवर भर दिला आणि त्यातूनच हे यश मिळाले.त्याची ही काबाड कष्ट करण्याची जिद्द व चिकाटी पाहून श्री.विजयकुमार परीट गट विकास अधिकारी पंचायत समिती इंदापूर यांनी त्याचे कौतुक करून आपल्या कार्यालयात सत्कार केला आहे.

     

वडिलांच्या कामाची कधीच लाज वाटली नाही..

समर्थ म्हणाला, बाबांच्या कामाची कधीच लाज वाटली नाही, वाटला तो अभिमानच.माझ्या यशात आई, बाबांसोबतच चुलते गणेश पवार आणि श्री.नारायणदास रामदास शाळेच्या प्राचार्यांपासून ते वर्गातील शिक्षकांचा वाटा आहे, असेही तो म्हणाला.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!