June 30, 2025 7:18 am

भिगवण मुस्लिम बांधवांच्या वतीने निषेध मूक मोर्चाचे आयोजन

अपनी भाषा में पढ़े! Translate

भिगवण मुस्लिम बांधवांच्या वतीने निषेध मूक मोर्चाचे आयोजन

(निलेश गायकवाड )

भिगवण : भाजप प्रवक्त्या नुपूर शर्मा व नविन कुमार जिंदाल यांनी देशात जातिय व धार्मीक तेढ निर्माण करण्यासाठी महम्मद पैगबर यांच्या बद्दल अपशब्द व घाणेरडे शब्द वापरल्याबद्दल यांचेवर त्वरित कायेदशिर कारवाई कारून अटक करण्यात यावे. नुपूर शर्मा व नविन कुमार जिंदाल यांनी महम्मद पैगबंर यांच्या बद्दल अपशब्द व घाणेरडे शब्द वापरून पुर्ण भारत देशातील मुस्लीम समाजाच्या भावना दुखविल्याने यांचे विरोधात कारवाई करण्यात यावी. याबाबतचे निवेदन मुस्लिम बांधवांच्या वतीने भिगवण पोलीस स्टेशनं देण्यात आले होते. यासाठी सोमवार दिनांक 13/06/2022 रोजी भिगवण व परिसरातून शहरातून बहुसंख्येने सर्व मुस्लीम बांधव यांचे वतीने सकाळी 10 वाजता मुख मोर्चा अत्यंत शांततेतपोलीस प्रशासनाने दिलेल्या नियमाचे पालन करून अत्यंत शांत हा मोर्चा जमा मस्जिद भिगवण येथून काढण्यात आला होता. मूक मोर्चा साठी सर्व परिसरातील शेकडो मुस्लीम बांधव उपस्थित होते. या मूक मोर्चा दरम्यान पोलीस निरिक्षक दिलीप पवार यांनी पोलिसांचा चोख बंदोबस्त होता.यावेळी पवार यांचे मुस्लीम समाज बांधवाच्या वतीने आभार मानण्यात आले.

            

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!