June 30, 2025 1:29 am

मौजे जंक्शन येथील तमन्ना शेखची नायब तहसीलदारपदी निवड…

अपनी भाषा में पढ़े! Translate

मौजे जंक्शन येथील तमन्ना शेखची नायब तहसीलदारपदी निवड…

इंदापूर प्रतिनिधी – आदित्य बोराटे

जंक्शन (ता.इंदापूर) येथील व (सध्या थेरगाव) येथे राहणाऱ्या तमन्ना शेख हिने स्पर्धा परीक्षेमध्ये (२०२१-२२) उत्कृष्ट असे यश मिळवले व नायब तहसीलदारपदी तिची निवड झाली.त्यामुळे संजय गांधी निराधार योजनेचे तालुकाध्यक्ष सागर बाबा मिसाळ मित्र परिवाराच्यावतीने पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.

तमन्नाच्या घरची परिस्थिती बिकट असून तिची आई शिवणकाम करून कुटुंबाला हातभार लावते,तर वडील फोर्स मोटर्स कंपनीत कामगार आहेत. तमन्ना हीने कुठलाही क्लास न लावता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली व तिसऱ्या प्रयत्नांमध्ये मुलींमध्ये राज्यात ८ वी, सर्वसाधारण गटात १०६ वी येऊन तिची नायब तहसीलदारपदी निवड झाली. “मुस्लिम समाजामध्ये शिक्षणाबद्दल जागरूकता कमी आहे. मुलींना शिक्षणापासून वंचित ठेवले जाते.त्यामुळे मुस्लिम महिला संवेदनशील असतात.त्यांनी जातीच्या बुरख्यातून बाहेर पडून पुढील पिढीला शिक्षणासाठी प्रोत्साहित करावे व नवीन पिढीला आगळा वेगळा आदर्श निर्माण करावा.” असे उद्गार संजय गांधी निराधार योजनेचे तालुकाध्यक्ष सागर मिसाळ यांनी काढले.

 

  

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!