June 30, 2025 3:26 am

जातोडा-बोरगांव येथे वस्त्रोद्योग तंत्रज्ञान व करिअर विषयावर कार्यशाळा

अपनी भाषा में पढ़े! Translate

जातोडा – बोरगांव ग्राम पंचायतीच्या संयुक्त विद्यमाने गावातील तरूणांसाठी निम्स कॉलेज शिरपूर तर्फे वस्त्रोद्योग तंत्रज्ञान आणि करिअर संधी या विषयावरील माहितीपर कार्यशाळा आयोजित करण्यात आली.यावेळी प्रा. रणजित तुरुकमाने यांनी टेक्सटाईल टेक्नोलॉजीची व्याप्ती आणि करिअर संधी विषयावर विस्तृत माहिती उपस्थित बोरगांव-जातोड्यातील तरुणांना दिली. शिरपूर तालुक्यातील बऱ्याच तरुणांनी टेक्सटाईल डिप्लोमा करून भारतातील विविध शहरात जॉब मिळविला असल्याचे प्रा तुरुकमानेंनी उपस्थितांना सांगितले. बोरगांव चे उपसरपंच योगेंद्रसिंग सिसोदिया यांनी माजी शिक्षणमंत्री आ श्री अमरिशभाई पटेल यांच्या मुळे तालुक्यातील तरुणांना नोकरी साठी परराज्यात भटकंती करावी लागत नसल्याचे सांगितले तसेच आ भाईंच्या शिक्षण क्षेत्रातील दूरदृष्टी बद्दल उपस्थितांना माहिती दिली. आ भाईंनी शिरपूर शहरात टेक्सटाईल कॉलेज आणली म्हणून बऱ्याच तरुणांनी शिरपूर शहरातच डिप्लोमा केला व शिरपूर मध्येच टेक्सटाईल पार्क येथील टेक्सटाईल कंपनीत नोकरीला लागले असल्याची माहिती उपसरपंच  सिसोदियांनी दिली. गावांतील तरुणांनी टेक्सटाईल क्षेत्रात आपले करिअर करावे तसेच ऍडमिशन संदर्भात काही अडचणी असतील तर त्या सोडविल्या जातील असे पंचायत समितीचे माजी उपसभापती जगतसिंग राजपूत यांनी आपल्या मनोगतात स्पष्ट केले. यावेळी प्रा. सुजित गुल्हाने व प्रा. प्रफुल्ल कोलते यांनी पण टेक्सटाईल करिअर संधी विषयावर अनमोल मार्गदर्शन केले. पं स माजी उपसभापती जगतसिंग राजपूत, बोरगांव उपसरपंच तथा सरपंच महासंघ तालुकाध्यक्ष योगेंद्रसिंग सिसोदिया, केव्हीपी स्थानिक स्कुल कमेटी चेअरमन उदेसिंग भटेसिंग राजपूत, जातोडा सरपंच रावसाहेब धनगर, उपसरपंच दर्यावसिंग राजपूत, माजी उपसरपंच देवेंद्र राजपूत, ग्रा पं सदस्य मोहन राजपूत, कोमल राजपूत, जितू राजपूत, रविंद्र निकूम, शिवाजी तिरमले, भिमसिंग राजपूत, राजेंद्र निकूम यांच्यासह बोरगांव-जातोडा येथील तरुण युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.    

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!