शिरपूर: तालुक्यातील प्रशासकीय यंत्रणेतील हलगर्जीपणा माझ्या सतत लक्षात येतंय. तालुका प्रमुख शिवसेना दिपक चोरमले मागील काही दिवसांपासून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विषय घेऊन शिरपूर तालुक्यातील गट शिक्षण अधिकाऱ्यांना कार्यालयात भेट देत असताना कार्यालयात गट शिक्षण अधिकारी सतत गैरहजर असतात. शिरपूर तालुक्यातील अनेक शैक्षणिक विषयांवर यांचा हलगर्जीपणा विद्यार्थ्यांचं नुकसान करत आहे. सतत कार्यालयात गैरहजर असल्या मुळे आपण कोणामुळे कार्यालयात गैरहजर असतात, कोणाचा आपल्यावर दबाव आहे का याचं स्पष्टीकरण आपण द्यावा. गटशिक्षाधिकारी कुमावत सतत कार्यालयात गैरहजर असतात शाळेवर हफ्ते घ्यायला हजर असतात. यांची योग्य ती चौकशी करावी व सेवामुक्ती करावे ही मागणी तालुकाप्रमुख दिपक चोरमले यांनी मागणी केली आहे.ED , अँटीकरप्शन यांचेकडे तक्रार केली आहे.