इंदापूर तालुका भारतीय जनता पक्षाची आज होणार कार्यकारणी जाहीर – शरद जामदार
इंदापूर प्रतिनिधी – आदित्य बोराटे
इंदापूर तालुका भारतीय जनता पक्षाची कार्यकारिणी आज दि.३० एप्रिल रोजी इंदापूर अर्बन बँकेमध्ये दुपारी २:३० वा. राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जाहीर होणार असल्याची माहिती भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष शरद जामदार यांनी दिली.
भारतीय जनता पक्षाचे पुणे जिल्हा अध्यक्ष गणेश भेगडे, पश्चिम महाराष्ट्र भाजपा अध्यक्ष जालिंदर कामठे, पुणे जिल्हा भाजपा सरचिटणीस धर्मेंद्र खांडरे यावेळी उपस्थित राहणार आहेत. युवा मोर्चा, महिला आघाडी तसेच सर्व सेल पदाधिकारी यांची निवड होणार आहे.
तालुक्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांनी आज अडीच वाजता इंदापूर अर्बन बँकेमध्ये कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन तालुकाध्यक्ष शरद जामदार व शहराध्यक्ष शकीलभाई सय्यद यांनी केले.
निधन वार्ता
प्रतिनिधी भगवान लोंढे

कुंभारगाव शालन अर्जुनराव शिरसट खानवटे (ता. दौंड) येथील माजी सरपंच अर्जुनराव शिरसट यांच्या पत्नी सौ. शालन अर्जूनराव शिरसट यांचे अल्पशा आजारपणा नंतर निधन झाले.
त्यांच्या मागे पती, दोन मुले – मुली, नातवंडे असा परिवार आहे. भिगवण येथील कला महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. सुरेंद्र शिरसट हे त्यांचे चिरंजीव होत. त्यांचा दशक्रियाविधी सिद्धटेक (ता. कर्जत) येथे गुरुवार दि. ०५/०४/ २०२२ रोजी सकाळी ८ वा. होणार आहे.