June 30, 2025 12:30 am

भिगवण पत्रकार संघाचे रक्तदानाचे कार्य कौतुकास्पद- राज्यमंत्री भरणे..

अपनी भाषा में पढ़े! Translate

भिगवण पत्रकार संघाचे रक्तदानाचे कार्य कौतुकास्पद- राज्यमंत्री भरणे..

(निलेश गायकवाड )

भिगवण पत्रकार संघाचे सामाजिक कार्य कौतुकास्पद असून परिसरातील पत्रकारांनी यांचा आदर्श घ्यावा असे आवाहन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती निमित्त इंदापुर तालुक्यातील मदनवाडी चौकात भिगवण पत्रकार संघाने आयोजित केलेल्या रक्तदान शिबीराचे उद्घाटन राज्याचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर,भिगवणचे सहाय्यक पोलिस निरिक्षक दिलीप पवार,भीमशक्ती संघटनेचे शरद चितारे,माजी सरपंच तुकाराम बंडगर, रोटरीचे अध्यक्ष संजय खाडे,सचिन बोगावत, संपत बंडगर डॉ. अमोल खानावरे, दादासाहेब थोरात,सतिश शिंगाडे,विष्णूपंत देवकाते,नितीन चितळकर,अजिंक्य माडगे,विशाल धुमाळ, मोहन शेंडगे, आदी उपस्थित होते.
भिगवण पत्रकार संघ नेहमी आदर्श उपक्रम करत असते संघाने अनेकवेळा रक्तदान शिबीरे आयोजित केले आहेत अमर बौध्द युवक संघाने आयोजित केलेल्या जयंती उत्सवावेळी रक्तदान आयोजित केले होते तर अहिल्यादेवी जयंती उत्सवावेळी देखील रक्तदान शिबिर आयोजित करुन महापुरुषांच्या जयंती उत्सवात रक्तदान करण्याचा आदर्श उपक्रम भिगवण पत्रकार संघाने चालु केला आहे.या बरोबरच संघातील अनेक सदस्यांनी ४० ते ५० हुन अधिक वेळा रक्तदान करुन समाजापुढे पत्रकार आदर्श निर्माण केला आहे तर बातम्यांमधुन समाजाचे गुणदोष दाखवत असताना आपणही समाजकार्यात प्रत्यक्ष सहभागी राहण्याचा भिगवण पत्रकार संघाचा प्रघात राज्यातील सर्वच पत्रकारांनी घेतला पाहिजे असे राज्याचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे उद्घाटन प्रसंगी बोलताना म्हणाले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!