खेड सोसायटीवर श्री.गणेश शेटीबाबा सहकार पॅनेलने फडकवला झेंडा
१२/१ चा दणदणीत विजय
प्रतिनिधी.संदिप कायगुडे
कर्जत .तालुक्यातील महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या खेड सोसायटी पंचवार्षिक निवडणूक सन २०२२ ते २०२७ श्री.गणेश शेटीबाबा सहकार पॅनेलने या निवडणूकीत १२-० विजय संपादित केला. आहे.त्या अगोदर एक जागा विरोधी म्हणजे शेतकरी विकास गटाची बिनविरोध झाली होती. त्यामुळे आत्ता ते राजकीय समीकरण १२-१ असे झाले आहे.या विजयामुळे शेटीबाबा सहकार गटाची विजयाची परंपरा कायम राहिली आहे.या विजयाने या गटाची विजयाची घोडदैड परंपरा अखंडीत सुरू ठेवली.या निवडणुकीत सर्व बाराही उमेदवार अधिकच्या फरकाने विजयी झाले.विजय उमेदवारामध्ये सर्वसाधारण पुरुष गटातून चंद्रकांत कायगुडे, प्रदीप गायकवाड, दादा दातीर , एकनाथ पाडूळे, पांडुरंग पावणे, भरत पावणे, बाळासाहेब मोरे, वसंत साळुंके, तर महिला प्रतिनिधी राखीवमधून अलका आगवण, हिराबाई कायगुडे, नागरिकांचा मागास प्रवर्गातून काशीनाथ खराडे, भटक्या विमुक्त जातीमधून मधुकर कायगुडे हे उमेदवार विजयी झाले. शेतकरी विकास गटाचे नेतृत्व श्रि.नारायण मोरे पाटील यांच्या मार्गदर्शनात श्रि.धनंजय मोरे पाटील यांनी केले केले तर श्री.गणेश शेटीबाबा सहकार गटाचे नेतृत्व विठल गणपत मोरे यांनी केले.या विजया नंतर विजयी सभेच्या भाषणातून गणपत कायगुडे, अण्णासाहेब मोरे, रवींद्र पाडुळे , विजय कायगुडे, बाबासाहेब मोरे, विठ्ल मोरे यांनी कार्यकर्त्यांचे व मतदारांचे आभार मानले. व संचालक मंडळाला शुभेच्छा दिल्या.
