June 29, 2025 8:52 pm

आता कोविडच्या नावानं चांगभलं !
दरमहा 23 लाख 60 हजाराची खैरात !

अपनी भाषा में पढ़े! Translate

आता कोविडच्या नावानं चांगभलं !
दरमहा 23 लाख 60 हजाराची खैरात !

कोरानाच्या महामारीत सर्व सामान्य जनता मेटाकुटीस आली कर्जबाजारी झाली होती परंतू काही घटकांनी यातही आपले उखळ पांढरे करून घेतले व मालामाल झाले. ठाणे येथील वेदांत रुग्णालयाने माझे मित्र विलास देशपांडे‌ याच्याकडून‌ सव्वा दोन लाख रूपये अतिरिक्त आकारले होते.मी सर्व दलालांची साखळी तोडून 2 लाख 15 हजार रूपये वसूल करून दिले.या वरून कोविड काळात रूग्णांना कसे लुबाडले जात होते हे लक्षात येईल. अशीच लूटमार औषधं,इंजेक्शन,उपचार आदी निमित्ताने केली होती.कोविड बीलांना Audit नसल्याने वारेमाप लूटमार केली गेली. उल्हासनगर महानगरपालिका याला अपवाद असूच शकत.


उल्हासनगर महापालिकेने सुरूवाती पासून Sai Platinum या रूग्णालयावर मेहेरनजर केली. परंतू आता कोविड परिस्थिती नियंत्रणात आली आहे. शासनाने कोविडचे सर्व निर्बंध उठवले आहेत.कोविड रूग्णांची संख्या नगण्य आहे. तसेच महापालिकेचे Atlantia येथे स्वतःचे 200 बेड क्षमतेचे अद्ययावत रूग्णालय आहे. तसेच 4 नं व 3 नंबर येथे शासकिय रूग्णालयांत ऐनवेळीची व्यवस्था आहे. या शिवाय Red Cross, Town Hall व Dr.Babasaheb Ambedkar Vachnalay इतक्या ठिकाणी कोविड रूग्णांची ऐनवेळी सोय होऊ शकते.
इतके सर्व पर्याय शिल्लक असताना 31 मार्चच्या स्थायी समितीच्या मिटींगमधे Sai Platinium हे खाजगी रूग्णालयास दरमहा 20 लाख +GST असे 23 लाख 60 हजार देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीत आणला आहे. हा प्रस्ताव म्हणजे लूटमार करण्याचा अतिशय हिन पातळीचा प्रयत्न आहे.‌आगामी 3 महिने वा अनिश्चीत काळापर्यंत दरमहा 23 लाख 60 हजार रुपये बहाल करणे म्हणजे कोविडच्या नांवे कमिशनच्या नावे दरमहा 5-6 लाख घश्यात घालण्याचा नीच पातळीचा प्रयत्न आहे. कारण एकही रूग्ण नसला तरी रूग्णालयाला 23.60 लाख हमखास मिळणार ! हा प्रकार आयजीच्या जीवावर बायजी उदार असा आहे. भ्रष्टाचार करायची एकही संधी हे लोक सोडत नाहीत,असे गिधाडी प्रवृत्तीचे लोक मानवतेस लागलेले कलंक आहेत. Sai Platinium या रूग्णालयाची कोणतीही आवश्यकता नसताना सदर रूग्णालयास भाडे तत्वावर घेणे हा अविवेकीपणाचा अतिरेक आहे.
दिलीप मालवणकर
9822902470
ज्येष्ठ पत्रकार

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!