अमळनेरात ‘आरोग्यसवा’चा सेवायज्ञ! सात ठिकाणी मोफत आरोग्य तपासणी शिबिर

अपनी भाषा में पढ़े! Translate

IMG-20261009-WA0881

अमळनेरात ‘आरोग्यसवा’चा सेवायज्ञ! सात ठिकाणी मोफत आरोग्य तपासणी शिबिर

 

 

अमळनेर : विक्की जाधव.

सर्वसामान्य नागरिकांना आरोग्यसेवा सहज आणि मोफत उपलब्ध व्हावी, या उद्देशाने मा. ना. चंद्रकांतदादा पाटील व समर्थ युवा फाउंडेशन यांच्या पुढाकारातून ‘आरोग्यसवा’ मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. खान्देश शिक्षण मंडळ, मंगलग्रह सेवा संस्था, कृषी उत्पन्न बाजार समिती, लोकमान्य शिक्षण मंडळ आणि संत श्री सखाराम महाराज वाडी संस्थान, अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने १२ ते १८ ऑक्टोबरदरम्यान अमळनेर शहरासह तालुक्यातील सात ठिकाणी ही आरोग्य शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत. या उपक्रमामुळे नागरिकांना विविध आरोग्य तपासण्या मोफत करून घेण्याची संधी मिळणार आहे.

IMG-20261010-WA0018

या शिबिरात सामान्य आरोग्य तपासणी व उपचारांसोबत रक्तातील साखर, रक्तगट, रक्तदाब, कोलेस्ट्रॉल तसेच हिमोग्लोबिन, लाल व पांढऱ्या रक्तपेशी आणि प्लेटलेट्सची तपासणी करण्यात येणार आहे. याशिवाय ४० वर्षांवरील नागरिकांसाठी मोतीबिंदू व काचबिंदू तपासणी, महिला व पुरुषांना मोफत चष्मेवाटप, दातांची तपासणी, कीड काढणे, सिमेंट भरणे आणि हिरड्यांची तपासणी अशा सुविधांचाही समावेश आहे. महिलांसाठी ४० ते ६० वयोगटात स्तन कर्करोग तपासणीची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या शिबिरातील आरोग्य तपासण्यांचे दर्शनी मूल्य ३३ हजार ५०० रुपये असून, त्या मोफत उपलब्ध होणार आहेत.

शिबिरांचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे : १२ ऑक्टोबर रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती, अमळनेर; १३ व १४ ऑक्टोबर रोजी श्री मंगलग्रह मंदिर, अमळनेर; १५ ऑक्टोबर रोजी संत श्री सखाराम महाराज वाडी, अमळनेर; १६ ऑक्टोबर रोजी करपवाडे, ता. अमळनेर; १७ ऑक्टोबर रोजी जानवे-डांगरी (उदयनगर), ता. अमळनेर; तर १८ ऑक्टोबर रोजी लोकमान्य विद्यालय, जुने टाऊन हॉलजवळ, अमळनेर येथे शिबिर होणार आहे. सर्व शिबिरे सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत होतील. शिबिराचा लाभ घेण्यासाठी एक दिवस अगोदर नोंदणी करणे आवश्यक असून, पूर्वनोंदणीशिवाय लाभ मिळणार नाही, असे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!