कसाली मोहल्ला परिसरात गतिरोधक बसवण्याची मागणी;नागरिकांसह मान्यवरांची आक्रमक भूमिका

अपनी भाषा में पढ़े! Translate

IMG-20261009-WA0894

कसाली मोहल्ला परिसरात गतिरोधक बसवण्याची मागणी;नागरिकांसह मान्यवरांची आक्रमक भूमिका

 

​अमळनेर : विक्की जाधव.

शहरातील कसाली मोहल्ला परिसरात वाहनांचा वाढलेला वेग आणि त्यामुळे वारंवार टळणारे अपघातांचे प्रसंग यामुळे नागरिकांमध्ये तीव्र चिंता व्यक्त होत आहे. या गंभीर प्रश्नावर तातडीने उपाययोजना म्हणून परिसरात योग्य त्या ठिकाणी गतिरोधक (स्पीड ब्रेकर) बसवण्यात यावेत, अशी ठाम मागणी मा. मुख्याधिकारी, अमळनेर नगरपरिषद यांच्याकडे करण्यात आली आहे.

IMG-20261010-WA0018

​कसाली मोहल्ला परिसरातून दिवस-रात्र वाहनांची मोठी वर्दळ असते. अनेक वाहनचालक या रहिवासी क्षेत्रातही भरधाव वेगाने वाहने चालवत असल्यामुळे लहान मुले, वृद्ध व महिलांच्या जीवाला सतत धोका निर्माण झाला आहे. कोणतीही दुर्घटना घडण्यापूर्वी प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन तातडीने गतिरोधक बसवावेत, अशी मागणी परिसरातील रिजवान मन्यार, नईम पठाण, अमजद मेवाती, नविद पठाण, इकबाल हलवाई, करीम शेख, जुबेर पठाण आणि केफ पठाण व नागरिकांकडून होत आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!