श्री शिवप्रतिष्ठानतर्फे अमळनेरात उद्या पासून नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने दुर्गादौड महोत्सवाचे आयोजन भाविकांनी उपस्थित राहण्याचे आयोजकांचे आव्हान..

अपनी भाषा में पढ़े! Translate

IMG-20261010-WA0089

 श्री शिवप्रतिष्ठानतर्फे अमळनेरात उद्या पासून नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने दुर्गादौड महोत्सवाचे आयोजन भाविकांनी उपस्थित राहण्याचे आयोजकांचे आव्हान..

 

 

अमळनेर : विक्की जाधव.

शहरातील धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेला नवी ऊर्जा देण्यासाठी श्री शिवप्रतिष्ठान, जय बजरंग मंडळ, पानखिडकी, अमळनेर यांच्या वतीने नवरात्री उत्सवानीमित्त सालाबादप्रमाणे दुर्गादौड महोत्सव २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, ११ ऑक्टोबर ते मंगळवार, २० ऑक्टोबरदरम्यान होणाऱ्या या महोत्सवात दररोज पहाटे ५ वाजता दुर्गादौड काढण्यात येणार आहे. त्यामुळे शहरात भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरण निर्माण होणार आहे.

IMG-20261010-WA0018

दहा दिवस चालणाऱ्या या उपक्रमात शहरातील विविध देवी मंदिरांसह अन्य धार्मिक स्थळांना भेटी देण्यात येणार आहेत. शहरातील विविध गल्ल्या, चौक आणि परिसरांतून निघणाऱ्या या दुर्गादौडीच्या माध्यमातून देवीभक्ती, धार्मिक जागृती आणि सामाजिक एकोपा वाढविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

महोत्सवाचा समारोप २० ऑक्टोबर रोजी श्री अंबरीष ऋषी महाराज टेकडी येथे होणार आहे. पानखिडकी येथील श्री इच्छापूर्ती दुर्गा माता मंदिर हे या उपक्रमाचे प्रमुख स्थळ आहे. नागरिक आणि भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन या धार्मिक सोहळ्याची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!