मनमिळाऊ स्वभाव, सेवाभावी वृत्ती अन् उद्योजकीय कर्तृत्वाचा संगम; विक्की आबा जाधव यांचा आज वाढदिवस! विविध स्तरावरून होतोय शुभेच्छांचा वर्षाव
अमळनेर : आई सप्तशृंगी देवीचे निस्सीम भक्त, मनमिळाऊ स्वभाव आणि सेवाभावी वृत्तीच्या जोरावर सर्वांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण करणारे रोशनी ट्रेडर्सचे संचालक आबासो विक्की आबा जाधव यांचा आज वाढदिवस उत्साहात साजरा होत आहे. शहरातील प्रतिष्ठित उद्योजक म्हणून ओळख असलेल्या विकी आबा जाधव यांनी आपल्या व्यावसायिक वाटचालीसोबतच आपुलकीच्या स्वभावातून विविध क्षेत्रांतील लोकांशी जिव्हाळ्याचे संबंध निर्माण केले आहेत. त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील साधेपणा, माणुसकी आणि प्रत्येकाशी आपलेपणाने वागण्याची वृत्ती यामुळे त्यांचा मित्रपरिवारही मोठा आहे.
विक्की आबा जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त अमळनेर शहरातील राजकीय, व्यापारी, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांसह मित्रपरिवाराकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. आई सप्तशृंगी देवीच्या आशीर्वादाने त्यांच्या आयुष्यात सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि यशाची नवनवी शिखरे गाठण्याची संधी लाभो, हीच सदिच्छा व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देताना मित्रपरिवारात आनंदाचे वातावरण असून, आबासो विक्की आबा जाधव यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
शुभेच्छुक : अमळनेर तालुका युवा मित्रपरिवार